पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा सामाजिक हेडलाइन

काकीच्या मिठीत पुतण्या, साळसुदपणाचा आणतो आव, काकाच्या खुनात इतरांना गुंतवण्याचा टाकतो डाव.

फाजलपूर येथील बीर सिंहचे गावातील रवि, अंकुश, शकील, ब्रम्हपाल यांच्याबरोबर भांडण झाले, तेंव्हा त्या चौघांनी त्याला ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिली. त्यानंतर दहा-बारा दिवसातच बीर सिंहचा खून झाला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, पण त्यांचा या खुनाशी काही संबंध नसल्याचे उघड झाले. पोलीस या प्रकरणाच्या तळाशी गेले आणि परिस्थितीचा ङ्गायदा उठवणारे एक षडयंत्र उघड झाले.

०००

उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यामधील फाजलपूर या छोट्या गावात बीर सिंह हा तरूण रहात होता. जनावरांना नाल मारण्याचे काम तो करत असे. तसेच इतरही काही मोलमजूरी करून तो संसाराचा गाडा ओढत होता. तो त्याची पत्नी सुशिला आणि दोन मुलांसह रहात होता. याच गावात त्याचे भाऊ परिवारांसह रहातात. या परिवाराचा व्यवसाय एकच असल्याने ते नेहमीच एकमेकाच्या संपर्कात रहात होते. बीर सिंहचे आर्थिक कारणावरून गावातील अंकुश, रवि, ब्रम्हपाल आणि शकील यांच्याबरोबर वाद होता. याच कारणावरून दि. २ जानेवारी रोजी त्या चौघांबरोबर बीर सिंह आणि सुशिला यांच्याबरोबर भांडण झाले. पैसे लवकर दे अन्यथा तुझी धडगत नाही असा दम त्या चौघांनी दिला, तेंव्हा गावातील लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. त्यानंतर दि. १३ रोजी बीर सिंह सुआवाला बाजारात मोटरसायकलने गेला होता. तो रात्री उशिरापर्यत परत आला नाही, त्यामुळे त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बीर सिंहचा शोध सुरू करण्याआधीच एक खबर मिळाली. दि. १४ जानेवारी रोजी सकाळीच सुआवाला ते मच्छिमार या मार्गावरील हरपूर गावच्या हद्दीत बीर सिंहचा मृतदेह पडल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच आजूबाजूच्या गावातील बघ्यांची गर्दी जमली होती. बीर सिंहच्या परिवारातील लोकही आले होते, ते रडत होते. अफजलगढ पोलीस ठाण्यातील पथकाने पंचनामा करून तपासाला सुरूवात केली, तेंव्हा बीर सिंहचे भाऊ, बायको यांनी चौघांवर संशय व्यक्त केला. आर्थिक कारणावरून त्या चौघांना बीर सिंहशी वाद होता. दि. २ जानेवारीला त्यांनी त्याला धमकी दिली होती अशी माहितीही पोलिसांच्या हाती लागली, त्यामुळे पोलिसांनी त्या चौघांची धरपकड सुरू केली. त्यांना पोलीस कोठडीची हवा देऊनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही, तर दुसरीकडे पोलिसांचे खबरे सक्रीय झाले होते. पोलीस गोपनिय माहिती गोळा करत होते. यामध्ये एक माहिती पोलिसांना मिळाली ती चक्रावणारी होती. दोन महिन्यापूर्वी बीर सिंह आणि त्याला नात्याने पुतण्या लागणार्‍या सोमपालचे जोरदार भांडण झाले होते. सोमपाल शेजारच्याच मच्छिमार गावात रहात होता. तो नेहमीच काकी सुशिलाला भेटायला येत असे. त्यावरूनच बीर सिंहचा त्याच्याशी वाद झाला होता. हा वाद सर्व नातेवाईकांनाही माहित होता, त्याची चर्चाही दोन्ही गावात झाली होती. त्या संशयावरून पोलिसांनी सोमपालला ताब्यात घेतले आणि नवी माहिती पोलिसांसमोर उघड झाली. हा एक वासनेचा खेळ होता.

सुशिला आता पस्तीशीला पोहचली होती. घरकामाशिवाय तिच्यावर आता कसलीच जबाबदारी नव्हती. नवरा बीर सिंह जिकडे काम असेल तिकडे सकाळी गेला ती रात्री परत यायचा. रिकाम मन सैतानाचं घर म्हणतात तशी सुशिलाची अवस्था झाली. तिचा रिकामा वेळ कोणाशी तरी गप्पा मारण्यात जात होता. आता बाई बोलत बसते म्हटल्यावर तिच्यापाशी घुटमळणार्‍यांची संख्याही वाढते. सुशिलाबरोबर ओळख वाढवण्याची अनेकांची धडपड होती. त्यातच सोमपाल होता. वयाची विशी ओलांडलेला सोमपालही रिकामटेकडाच होता. तो बीर सिंहच्या घरीही येत-जात असे, कारण तो त्याला नात्याने काका लागत होता. काका घरात नसला तरी काकी त्याला ये बस करत होती, त्यामुळे तो गावात आला की सुशिलाला भेटण्यासाठी हमखास येत असे. ती त्याच्यापेक्षा ८-१० वर्षांनी मोठी होती. नात्याने काकी म्हणजे आईसारखीच होती, पण जवानीच्या जोशात वासनेने थैमान घातलेल्या मनात सुशिला ही एक मस्त बाई आहे हे विचार घोळू लागले. त्याची नजर तिच्या शरीराला चाचपू लागली. साडीसारख्या पेहरावातही दिसणारे तिचे शरीर त्याला खुणावू लागले. ती त्याच्यासमोर बिनधास्त वागत असल्याने बर्‍यापैकी देहदर्शन घडत असे. ते पहाण्यासाठी तो नेहमीच तिच्याकडे येऊ लागला. त्याच्या वाढलेल्या ङ्गेर्‍या, बदललेली नजर, वागण्यातला संकोच तिच्याही लक्षात आला. तो आपल्यापेक्षा लहान आहे, मुलासारखा आहे असा विचार तिने केला पण तो विचार ङ्गार काळ टिकला नाही. वासनेचा विखारच इतका जालीम होता की तिनेही लाज सोडण्यास सुरूवात केली. तिला त्या दमदार गड्याबरोबर मुख्य खेळ खेळायचा होता, त्याच्या मनातही तीच इच्छा होती. तो तयार होता. त्यांच्यातील अनैतिक संबंधांची  सुरूवात झाली

बीर सिंह घराबाहेर पडला की सोमपाल यायचा आणि तिच्याशी संबंध ठेवायचा. याबद्दल कोणाला काहीच माहित झाले नाही. कारण दोघांतील नाते, वयातील ङ्गरक यामुळे कोणी संशय घेण्याचे कारण नव्हते. दिवसामागून दिवस जात होते. वर्ष झाले, दोन वर्ष झाली. ते अगदीच निवांत झाले होते. दोघांचा मनसोक्त खेळ रंगत होता. ही चोरी कधी पकडली जाईल अशी शंकाही त्यांच्या मनात नव्हती, पण पाप ङ्गार काळ लपत नाही. लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे नाकाबंदी झाली, तेंव्हा सुशिला आणि सोमपालच्या मौजमजेवरही जणू बंदी आली होती. तिला बीर सिंहकडून सुख मिळत होते, पण सोमपाल मात्र तिच्यासाठी तळमळत होता. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. तो तिला भेटायला येऊ शकत होता. तिला बघता येत होते, पण मिठीत घेता येत नव्हते. कारण बीर सिंह घरात असायचा. जेंव्हा कामे सुरू झाली, तेंव्हा बीर सिंह कामानिमित्त बाहेर पडू लागला. तसे सुशिलाला परत रिकामे रान मिळाले. तिने लगेचच सोमपालला ही माहिती दिली. सोमपाल तर भुकेलेलाच होता. तिच्याकडून सिग्नल मिळताच तो तिला भेटला आणि तिच्याशी मनसोक्त संभोग केला. आता पुन्हा त्याचे संबंध सुरू झाले. तो रोजच दुपारी येऊ लागला, तिच्याशी मौज करू लागला. एका दुपारी नेहमीप्रमाणे ते बेडवर मौज करत होते. बीर सिंह कामाला गेला होता. तो परत येणार नाही याची त्यांना खात्री होती, पण वेळ ङ्गिरली होती. बीर सिंह अचानक घरी आला. दरवाजा बंद बघून तो हाका मारू लागला. तसे बेडवर नंगानाच करणारे सोमपाल, सुशिला हबकले. अंगावरचे कपडे कसेबसे गुंडाळत तिने दरवाजा उघडला. दार बंद करून ते दोघे काय करत असतील हे न समजण्याइतका बीर सिंह खुळा नव्हता, पण आपली पत्नी आणि पुतण्या यांनी तोंड काळे केल्याने तो सुन्न झाला होता. ही संधी साधून सोमपालने पळ काढला. भानावर आलेल्या बीर सिंहनी सुशिलाला झोडपून काढलेच, शिवाय सोमपालच्या घरी जाऊनही त्याच्या घरच्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यामुळे हे प्रकरण सगळ्यांनाच समजले.

सगळीकडे बदनामी झाली होती. बीर सिंह पत्नीवर पाळत ठेऊन होता, त्यामुळे सुशिला आणि सोमपालचे भेटणे बंद झाले होते. ते मोबाईलमुळे एकमेकाच्या संपर्कात होते. दोन महिने कसेबसे गेले. दोघांनाही एकमेकाशिवाय करमत नव्हते. आता सुशिलाचे बीर सिंहबरोबरचे संबंधंही बिघडले होते, त्यामुळे तिलाही सोमपाल जास्त हवाहवासा वाटू लागला होता. त्याला तर तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हते, पण यावर उपाय काय याचा ते दोघे शोध घेत होते.

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बीर सिंहचे काही लोकांबरोबर पैशाच्या देवघेवीवरून भांडण झाले. ही संधी साधण्याचे सुशिलाने ठरवले. बीर सिंहचा काटा काढायचा आणि देणेकर्‍यांनी त्याला ठार मारले असा बनाव करायचा असे कारस्थान सुशिला आणि सोमपालने रचले. त्यामुळे आपल्यावर कोणी संशय घेणार नाही, असे त्यांना वाटत होते. याच विचारातून सोमपालने त्याचे मित्र लवकुश आणि एका अल्पवयीन मित्राची मदत घेतली. त्यांनाही त्याने प्लॅन समजावून सांगितला. त्यानंतर ते तिघे आणि सुशिला कामाला लागले.

बीर सिंह कामानिमित्त दि. १३ रोजी सुआवाला बाजार येथे जाणार असल्याची माहिती सुशिलाने सोमपालला दिली. तो रात्री उशिरा परत येणार याचा अंदाज असल्याने सोमपाल आणि त्याचे साथीदार रस्त्यावर दबा धरून बसले. रात्रीचा काळोख वाढू लागला. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली. रस्त्यालगतच्या शेतात मारेकरी दबा धरून बसल्याची कल्पना बिचार्‍या बीर सिंहला नव्हती. तो काम आवरून गडबडीने घरी जाण्यासाठी मोटरसायकलने निघाला होता. तो हरपूर गावाजवळ आला असता अचानक सोमपाल त्याच्या मोटरसायकलसमोर आला. त्याने मोटरसायकल थांबवली. त्या तिघांनी त्याला धरले आणि बाजूच्या शेतात नेले. तिथे त्याच्यावर लाकडी तसेच लोखंडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तिघे एकदम मारहाण करू लागल्याने बीर सिंह अगतिक झाला. त्यांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. तो निपचित पडल्यानंतरच ते थांबले. तो ठार झाल्याची त्यांनी खात्री केली. त्यानंतर त्याला ओढ्याला असलेल्या भिंतीलगत टाकून दिले. तिथून ते परत गेले.

दुसरीकडे बीर सिंह परत न आल्याने नातेवाईक शोधाशोध करू लागले, तेंव्हा सोमपालही शोधमोहिमेत सहभागी झाला. दुसर्‍या दिवशी बीर सिंहचा मृतदेह सापडल्यानंतर चार देणेकर्‍यांवर संशय व्यक्त करणार्‍यांमध्ये सोमपालही होता. सुशिलानेही देणेकर्‍यांवर संशय घेऊन त्यांना गुंतवून आपण सुटण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांना खरी माहिती मिळाली आणि या कारस्थानाचा पर्दापाश झाला. बीर सिंह याच्या खूनप्रकरणी अङ्गजलगढ पोलीस ठाण्यात गु.र.नं.१९/२०२१ कलम ३०२, १०२ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सोमपाल (वय २४, रा. ङ्गाजलपूर), लवकुश (वय २२, रा. रायपूर), सुशिला (वय ३५, रा. ङ्गाजलपूर) आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास प्रभारी निरीक्षक नरेशकुमार, उपनिरीक्षक संजीवकुमार तोमर, कॉन्स्टेबल शिवकरण, विजय तोमर, रविकुमार, अरविंद, संदीप, सीमान्त, मोहित कुमार, शशी कश्यप आदी करत आहेत. पोलीस पथकास या कामगिरीबद्दल १० हजार रूपयाचे बक्षिसही देण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!