
मुंबई – विशीच्या वयातच रूपालीने पस्तीशीच्या इकबालबरोबर लव्ह मॅरेज केले. सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू असतांना इकबालने नंतर तिला आपल्या धर्माची बंधने लादायला सुरूवात केली. यातून वाद वाढत जावून ती वेगळी राहू लागली. तो माझा मुलगा मला दे असे म्हणू लागला, पण ती त्याच्याकडे घटस्फोट मागत होती. यातूनच इकबालने तिचा जीव घेतला.
जळगाव – आपल्या नवर्याबरोबर झालेला वाद त्या विवाहितेने आपल्याबरोबर काम करणार्या तरूण सहकार्याला सांगितला. तो परराज्यातील तरूण होता. त्याचे नाव राजेशकुमा नारायण पासवान. बिहारच्या या तरूणाने जवळीक वाढवली. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली. राजेशकुमार नेहमी त्या विवाहितेला धीर देत असे, त्यामुळे तीदेखील घरात काही वाद झाले की त्याला सांगायची. एके दिवशी घरात वाद झाल्यानंतर तिच्या नवर्याने तिला माहेरी निघून जा असे सांगितली. ही बाब राजेशकुमारला सांगताच त्याने तिला भोपाळला येण्यास सांगितले. तीही त्याच्याकडे गेली. त्याचा गैरफायदा घेत राजेशकुमारने तिच्यावर अत्याचार केला. तिला हे अपेक्षित नव्हते. तिने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याबाबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी कारवाई करत राजेशकुमारला अटक केली आहे.
कोल्हापूर – आरतीला आपल्या घरात गुप्तधन आहे असे वाटत होते. तिला तशी स्वप्ने पडत होती, त्यामुळे तिने मांत्रिकांशी संपर्क वाढवला. यामध्ये त्या मांत्रिकांनी तिच्याकडून 4 लाख रूपये उकळले. इतकेच नव्हे तर नामदेव पोवार याने आरतीला शेतात बोलावून तिचा खून केला आणि तिच्या अंगावरचे दागिने चोरले. हा प्रकार त्याने आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी केला. पोलिसांच्या ताब्यात तो आल्यानंतर इतर साथीदारांची माहितीही पुढे आली आहे.
लातूर – अरविंद पिटले हा व्यसनी होता. त्याच्या या व्यसनापायी घरात आर्थिक चणचण भासू लागली. यासाठी सुनिताने कंबर कसली आणि ती कधी शेतामध्ये मजुरी तर कधी गावाजवळ असलेल्या कारखान्यात कामाला जावू लागली. या कारखान्यावर सुभाष शिंदे हा वॉचमन होता. त्याच्याशी सुनिताची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यामध्ये जवळीक वाढू लागली. सुभाष हा बाहेरगावचा होता. सुनिता आता त्याला जेवणाचा डबाही देवू लागली. सुभाषचे घरी येणे-जाणे वाढले होते. गावातील लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी अरविंदच्या कानावर ही गोष्ट घातली. यातूनच नवरा-बायकोमध्ये भांडण वाढू लागले, त्याचा अडसर दूर करण्यासाठी कट रचून अरविंदचा खून केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.
या सत्यकथाशिवाय आणखी काही सत्यकथा तुम्हाला अंक नं. 29 (रविवार दि. 30 ऑक्टोबर 2022)च्या पोलीस टाइम्समध्ये वाचायला मिळतील. अंक सर्व स्टॉल्सवर उपलब्ध! अंक घरपोच अथवा ऑनलाईन वाचावयास हवे असतील तुम्ही खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधा.
साप्ताहिक पोलीस टाइम्स कोल्हापूर – फोन – 0231- 2531696
मोबाईल – 9890257760 (संजय डासाळकर)
साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा.
वर्गणीचे दर खालीलप्रमाणे….
- तिमाही – रू. 150/-
- सहामाही – रू. 300/-
- वार्षिक – रू. 600/-
सदर रक्कम खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करून 0231-2531696 या क्रमांकावर संपर्क साधा. आपला अंक त्वरीत घरपोच देण्यात येईल.
नाव – पोलीस टाइम्स
बँक – IDBI बँक लि. शाखा – शाहुपूरी, कोल्हापूर.
खाते क्रमांक – 464 1201 000 1047
FSC – IBKL 0000464