पोलीस टाइम्स
अहमदनगर आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

नवऱ्याचा मित्र बनला बायकोचा यार! विशालच्या आत्महत्येने उद्ध्वस्त संसार!

तो पोलीस, त्याचा मित्रही पोलीस. कायद्याचे रक्षण करणारे दोघेही, पण मित्र म्हणून जवळीक साधणारा पक्का वैरी निघाला. त्याने मित्राच्या बायकोलाच ङ्गितवले. इतके की तिला नवरा, मुले, संसार तसेच आई-वडील या सगळ्यांपेक्षा वासना भागवणारा प्रियकरच जास्त जवळचा वाटू लागला. बायकोनेच साथ सोडल्याने निराश झालेल्या पोलिसाला कोठेच न्याय मिळाला नाही. संसार उध्वस्त झालेल्या या तरूणाने आत्महत्या केली. तो जग सोडून गेला, त्याची दोन मुले पोरकी झाली. या प्रकरणात त्याची बायको आणि तिचा प्रियकर सध्यातरी गजाआड झाले आहेत. वासनेची मस्ती बाईला किती कठोर बनवते, माणसातून उठवते याचा नमुना दाखवणार्‍या व डोळ्यात पाणी आणणार्‍या घटनेची राज्यभर निंदा होत आहे.

००००

 नगर तालुक्यातील देहरे गावच्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विशालने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून २००२ मध्ये पोलीस खात्यात भरती झाला होता. त्याच्या गावी आई निशाबाई, भाऊ देवेंद्र (वय ३६), भावजय आशाबाई व दोन पुतणे आहेत. विशाल हा देवेंद्रचा मोठा भाऊ. अहमदनगर पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक असे त्याठिकाणी आपले बिर्‍हाड करून सणासुदीला विशाल गावाकडे देहरे येथे येत असे. सण झाल्यानंतर पुन्हा तो नोकरीच्या ठिकाणी रूजू होत असे. विशालचे सासू-सासरे बेबी धसाळ व चंद्रकांत काशीनाथ धसाळ हेही अधून-मधून विशाल-सोनालीच्या परिवाराला हातभार लावत असत. विशालचे लग्न होवून दोन मुलानंतर त्याचा संसार सुरळीत चालला होता. त्याने पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर विविध ठिकाणी काम केले आहे. २०१४ मध्ये लोणी पोलीस स्टेशनला नेमणूक असतांना त्याची बदली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली होती. विशाल हा पत्नी सोनाली, मुले साईश्‍वर अन् वेदिका यांच्यासह नवीन गावी पोहचला. तिथे ड्युटीवर हजर झाला होता. श्रीरामपूर येथे गेल्यानंतर तो सप्टेंबर २०२० पर्यंत म्हाडा पोलीस लाईनमध्ये राहू लागला. विशाल हा ज्याठिकाणी बदली होत असे त्याठिकाणी लगेचच रूजू होत असे. गरीब स्वभावाचा विशाल कधीही झालेली बदली रद्द करून घेत नसे. तो त्याचा स्वभावच नव्हता. म्हाडा लाईनमध्ये रहाण्यास आल्यानंतर त्याची ओळख पोलीस लाईनमध्ये रहाणार्‍या पोलीस कॉन्स्टेबल विशाल खंडागळेशी झाली होती. एकाच खात्यात नोकरीस असल्याने दोघांचा चांगला परिचय झाला होता. अधून-मधून त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते.

पण विशाल खंडागळे हा अविवाहित असल्याने त्याचा विशाल हापसेच्या घरी येण्याचा उद्देश वेगळाच होता. हसतमुख, गरीब, सरळ स्वभावाच्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल हापसेच्या ती गोष्ट ध्यानात आलीच नाही. लोणी पोलीस स्टेशनमधून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला बदलून गेल्यानंतर जेंव्हापासून विशाल हापसेला विशाल खंडागळेसारखा ‘छचोर’ शेजार मिळाला तेंव्हापासून हापसे कुटुंबातील शांती र्‍हास पावली होती. म्हाडा पोलीस लाईनमध्ये शेजारी-शेजारी रहात असतांना खंडागळेचे हापसेकडे अन् सोनाली हापसेचे खंडागळेकडे येणे-जाणे चांगलेच वाढले होेते. सोनालीला तिचा नवरा विशालपेक्षा खंडागळे जास्त आवडू लागला होता. अविवाहित खंडागळेमध्ये ती जास्त अडकू लागली. पोलीस खाते म्हटले की २४ तास ड्युटी. आपल्या कौटुंबीक कामाच्या वेळेस कुठे ड्युटी लागेल ते सांगता येत नाही. त्यात सरळ, गरीब स्वभावाच्या माणसांचं काही खरं नाही. ते सतत साहेबाने दिलेल्या ड्युटीची तामिली करण्यात गर्क असतात, मात्र काही माणसं नेहमीच मौजमस्ती करण्यात मश्गुल असतात. सोनाली हापसे अन् विशाल खंडागळे हे दोघे जण नजरेच्या इशार्‍यावर चालणार्‍या गोष्टी प्रत्यक्ष उतरवू पहात होते. विशाल हापसेची दोनही लहान मुले साईश्‍वर अन् वेदिका नकळती होती. तरीही त्यातल्या त्यात साईश्‍वरला काही गोष्टी ध्यानात येत होत्या. हापसे अन् खंडागळे एकाच खात्यात नोकरीस असल्याने खंडागळे कधी एकदाचा हापसे ड्युटीत अडकेल अन् मला सवड मिळेल याची संधी पहात होता. लोणी पोलीस स्टेशनमधून बदलून आल्यापासून खंडागळेची नजर सोनालीवर होती. त्यांचे नावाला एकमेकांकडे जाणे-येणे सुरू होते, पण मिळायला हवी ती संधी – तो एकांत त्यांना मिळत नव्हता.

खंडागळे आणि हापसे हे दोघे जण ड्युटीवर असल्याने खंडागळे हापसेवर लक्ष ठेवून होता. तशी संधी त्याला अचानक चालून आली. हापसेला बंदोबस्ताची ड्युटी लागल्याने तो बंदोबस्तासाठी रवाना झाला, मात्र त्याचवेळी संधीसाधू खंडागळे सिकमध्ये गेला आणि म्हाडा पोलीस लाईनमध्ये घरीच थांबला. सोनालीने पोरांना काहीतरी निमित्त सांगून बाहेर पिटाळले होते. आजूबाजूचा कानोसा घेत खंडागळे सोनालीच्या घरात शिरला. कधी एकदाची घराला कडी लावून आत शिरतो असे त्याला झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट बघत होते तो क्षण त्यांच्यापुढे आला होता. तो आत शिरताच सोनाली आणि खंडागळे यांनी एकमेकांना बाहुपाशात जाम रगडून घेतले. दोघांच्या श्‍वासाची गती वाढू लागली होती. त्या श्‍वासाचे गरम सुस्कारे ते एकमेकांवर सोडीत होते. त्या विशालपेक्षा हा विशाल सोनालीला जास्तच उबदार अन् तरणाबांड वाटत होता. तिचे आसुसलेले ओठ आपल्या ओठावर टेकवत त्याने दीर्घ श्‍वास भरला. आता त्याचे दोन्ही हात तिच्या नितंबावरून सैरावैरा धावू लागले होते. ते कधी उरोजावर येवून थबकले ते कळलेच नाही. सोनाली चार-चौघीत देखणी असल्याने तिने तिची देहयष्टी राखली होती. तिचे उरोज कुस्करत असतांनाच त्या दोघांचाही बांध फुटला. दोघांनीही त्यांची वस्त्रे जलदगतीने दूर केली. अन् त्यानंतर सुरू झाला तो समाधीचा काळ. दोघंही एकमेकांत एकरूप झाली होती. त्यांना आता या जगात त्यांच्याशिवाय कोणीच दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांची तगमग त्यांनी शांत केली होती. गेली काही मिनिटे आलेली मस्ती आता ओसरू लागली होती. काही काळ बेडवर निपचित पडून राहिल्यानंतर ते दोघे भानावर आले. एकमेकांकडे स्मित हास्य करत अंगावरच्या कपड्यांची सारवासारव केली. जणू काही घडलेच नाही अशा मुद्रेत खंडागळे इकडे-तिकडे बघत सोनालीच्या घरातून बाहेर पडला. आज ते दोघेही जगाला विसरून तृप्त झाले होते. त्यांनी आता सगळं काही गुंडाळून ठेवलं होतं. घराबाहेर गेलेल्या साईश्‍वर अन् वेदिकाला हाक मारून सोनालीने जणू काही घडलेच नाही असा आव आणला खरा, मात्र जगाच्या नजरेतून ती उतरू लागली होती.

सोनाली व विशाल खंडागळे यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण सोनालीचा पती विशाल हापसे याला लागल्यानंतर तो तणावात आला होता. ज्या खंडागळेला त्याने श्रीरामपूर येथे आल्यानंतर मित्र मानले होते, त्यानेच त्याच्याशी गद्दारी केली होती. विशाल तणावात आल्यानंतर त्याने या गोष्टीची माहिती त्याचा धाकटा भाऊ देवेंद्र याला सांगितली होती, तेंव्हा विशाल, त्याचा भाऊ देवेंद्र व इतर नातेवाईकांनी २०१९ साली तत्कालीन डी.वाय.एस.पी. राहुल मदने यांची भेट घेवून त्यांना दोघांच्या अनैतिक संबंधाची माहिती दिली. तेंव्हा डी.वाय.एस.पी. मदने यांनी त्याला त्यांच्या कार्यालयात बोलावून कानउघाडणी केली होती. तसेच त्यानंतर त्याची बदली श्रीरामपूर येथून शिर्डी पोलीस स्टेशन येेथे करण्यात आली होती. बदली झाल्यानंतर विशाल खंडागळे त्याच्या मोबाईलवरून सोनालीला नेहमी फोन करत असे. व्हॉटसऍप करत असे. तसेच विशाल ड्युटीवर गेल्यानंतर खंडागळे त्याच्या घरी येत होता. त्यावेळी सोनाली व खंडागळे दोघे बोलत होते. याची माहिती तिचा मुलगा साईश्‍वर याने त्याचे वडील व चुलते देवेंद्र यांना सांगितली होती. हे सोनालीला कळल्यानंतर तिने त्याला दम देवून ‘तू कोणाला काही सांगितले तर तुला पाहून घेईन, मारून टाकीन’ असा दम दिला होता. सोनालीच्या वागण्यात फरक पडत नव्हता, तर खंडागळे तिचा नाद सोडत नव्हता. त्यामुळे विशाल हापसे, त्याचा भाऊ देवेंद्र व त्याचे सासरे चंद्रकांत धसाळ व सासू बेबी धसाळ अशा सर्व जणांनी डी.वाय.एस.पी. (शिर्डी) सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेवून खंडागळे हा हापसे यास त्रास होईल असे वागत आहे. त्याच्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणी केली होती. तसा अर्ज चंद्रकांत धसाळ यांनी दिला होता. खंडागळे याची बदली शिर्डी येथे होवूनही तो सोनालीशी नियमितपणे फोन, व्हॉटस्ऍप तसेच संधी साधून समक्ष संपर्क करत होता, त्यामुळे डी.वाय.एस.पी. वाकचौरे यांनी अर्जाची गांभीर्याने दखल घेवून त्याला समोर बोलावून तंबी दिली, तर त्याच्याऐवजी विशाल हापसे याची बदली सप्टेंबर २०२० मध्ये राहुरी येेथे केली.

राहुरी येथे बदली झाल्यानंतर हापसे शहरातील तनपुरे गल्ली येथे घर भाड्याने घेवून मुले व त्याची बायको सोनाली हिच्यासह सामानसुमान घेवून रहाण्यास आला होता. आज संपूर्ण जगाला जोडणार्‍या मोबाईलमुळे पुन्हा सोनालीने खंडागळेला संपर्क करून बदलीचे ठिकाण अन् रहात्या घराचा पत्ता दिला होता. सोनालीचा प्रियकर खंडागळेही तिच्या वासावर होताच. बदलीच्या ठिकाणी राहुरीच्या तनपुरे गल्लीत येऊन खंडागळे सोनालीला भेटून गेला होता. याची माहिती पुतण्या साईश्‍वर व पुतणी वेदिका यांनी त्यांचा चुलता देवेंद्र याला दिवाळीत ते घरी आले त्यावेळेस दिली होती. मम्मी दुसर्‍या फोनवरून खंडागळेशी बोलतांना बघितल्याचे त्या दोघा मुलांनी चुलत्याला सांगितले होते. त्यावरून वासनेने धुंद झालेल्या सोनालीने दोघाही मुलांना, पप्पांना काही सांगू नका… आता फक्त दोनच दिवस बोलणार आहे. नाहीतर तुमचा बेत पाहिन, अशी धमकी दिल्याची माहितीही चुलते देवेंद्र यांना दिली होती. अगोदर खंडागळेची शिर्डी येथे अन् त्यानंतर हापसेची राहुरी येथे बदली करूनही त्या दोघांमधील अनैतिक संबंध तुटत नव्हते. याउलट त्याचा दुष्परिणाम लहानग्या साईश्‍वर व वेदिकावरही झाला होता. या दोघांमुळे घरातील शांती नष्ट झाली होती. मित्र म्हणून घरात घुसलेल्या खंडागळेमुळे हापसे नेहमीच तणावात राहू लागला होता. आता त्याचे ड्युटीवरही मन लागत नव्हते. तो स्वभावाने गरीब असल्याने त्याच्या या स्वभावाचा गैरफायदा सोनाली आणि खंडागळे घेत होते. बदली हे त्याच्यावरील सोल्युशन नाही, हे आता सर्वांच्या ध्यानात आले होते. एकमेकांच्या शरीराला चटावलेले ते दोघे जण धुंद झाले होते. त्यांना जगाचे भान राहिले नव्हते. केवळ ते नर आणि मादी हेच त्यांना माहिती होते.

त्यामुळे जरासा थोडा वेगळा विचार करून मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिवाळी झाल्यानंतर देवेंद्र व त्याचा एक मित्र असे दोघे जण विशाल हापसे यांच्या राहुरी येथील तनपुरे गल्लीतील घरी आले. तेथे त्यांनी विशालचे सासरे अन् सोनालीचे वडील चंद्रकांत धसाळ यांना बोलावून घेवून या गंभीर विषयावर समक्ष चर्चा केली. बदली करूनही उपयोग झाला नाही, त्यामुळे आता खंडागळे याच्या शेवगाव येथील घरी जावून त्याला व त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याचे सर्वांनी ठरवले होते.

विशालचा धाकटा भाऊ देवेंद्र, त्याचा मित्र सुमित, पुतण्या साईश्‍वर, पुतणी वेदिका, चंद्रकांत धसाळे, बेबी धसाळ, विशालची आई निशा हापसे असे सर्व जण त्यांच्या मोटर क्रमांक एम.एच.१७ बी.व्ही.९४४२ मधून शेवगाव येथे विशाल खंडागळे याच्या घरी जाण्यसाठी निघाले होते. त्यांची ही धावपळ बघून सोनालीने खंडागळेला फोन करून सांगितले की, ‘आमच्या घरचे लोक तुझ्या घरी जाण्यासाठी शेवगावला निघाले आहेत.’ सोनालीने ही माहिती दिल्याने खंडागळे याच्या आईने देवेंद्रला फोन करून, ‘तुम्ही कुठे आहात’ अशी विचारणा करून माहिती काढून घेतली. सोनालीने अगोदरच कळवल्याने खंडागळे त्यांना न भेटता निघून गेला. त्याची आई ताराबाई, त्यांची मुलगी त्याठिकाणी त्यांना भेटली. त्यावेळी या सर्वांनी ‘तुमचा मुलगा विशाल यास समजावून सांगा. तो हापसेचा संसार उद्ध्वस्त करत आहे.’ अशी विनंती त्यांना केली आणि ते सर्वजण माघारी फिरले.

हापसे, धसाळ कुुटुंबीयांनी सोनाली तसेच विशाल खंडागळे यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र पालथ्या घागरीवर पाणी. एवढे सांगूनही ते वासनेत मदमस्त झालेले त्या दोघांवर तसूभरही फरक पडला नव्हता.

शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी रात्री देवेंद्र घरी असतांना त्याला पावणेआठ वाजता भाऊ विशालची आठवण आल्याने त्याने विशालला फोन केला. त्यावेळी रडवेल्या स्वरात विशालने देवेंद्रला, ‘व्हिडीओ कॉल कर’ म्हणून विनवणी केली. देवेंद्रने लगेचच त्याच्या फोनवरून व्हिडीओ कॉल केला. तेंव्हा विशाल म्हणाला, ‘माझी बायको सोनाली म्हणते की, विशाल खंडागळेचे आणि माझे संबंध आहेत. तू आमच्यातून बाजूला हो. नाही तर तुला मारून टाकू’ असा दम देत आहे. मला तुला एकदा पहायचे आहे. मी विषारी औषध प्यालो आहे.’ हे म्हणत-म्हणतच तो खाली कोसळला. तेंव्हा देवेंद्रला धक्का बसला. तो लगेचच त्याची गाडी घेवून देहरेहून राहुरीकडे निघाला. रात्री ८.३० वाजता तो राहुरीतील विशालच्या तनपुरे गल्लीतील घरी पोहोचला तेंव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितले की, विशालला डॉ. कुलकर्णी यांच्याकडे नेले आहे. देवेंद्र धावपळ करत कुलकर्णी हॉस्पिटलला गेला असता तेथील लोकांनी भाऊ विशालला प्रवरा हॉस्पिटलला पाठवल्याचे सांगितले, त्यामुळे देवेंद्र व त्याचे नातलग लगेचच रात्री ९.३० वाजता लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलला पोहोचले. त्यावेळी तेथील डॉक्टर विशालला तपासत होते. त्यांनी त्याची तपासणी करून तो मयत झाल्याचे सांगितले. शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून मृतदेह हापसे कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. हापसे कुटुंब मुळचे नगर तालुक्यातील देहरे गावचे असल्याने विशाल हापसेचा मृतदेह त्याच्या गावी आणण्यात आला. दरम्यान डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, हवालदार विठ्ठल राठोड, महिला कॉन्स्टेबल मनिषा गुंड, महिला पोलीस नाईक सुर्यवंशी, पोलीस नाईक निलेश मेटकर यांनी पंचनाम्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले.

एक नव्या उमेदीचा, हसतमुख, सरळ स्वभावाचा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस खात्याने गमावला होता, तर हापसे कुटुंबाचा लाडका लेक गेला होता. अतिशय शोकाकुल वातावरणात विशालचा अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी राहुरी पोलीस स्टेशन, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वरीष्ठ पोलीस अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशालच्या अंत्यविधीनंतर राहुरी पोलिसांनी विशालचा भाऊ देवेंद्र रामराव हापसे (वय ३६) याची दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेसात वाजता रितसर फिर्याद घेवून सोनाली विशाल हापसे, तसेच शिर्डी पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेला पोलीस नाईक विशाल खंडागळे याच्याविरूद्ध गुन्हा रजि.नं. २००३-२०२० भा.दं.वि. कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल राठोड, महिला कॉन्स्टेबल मनिषा गुंड, महिला पोलीस नाईक सुर्यवंशी, पोलीस नाईक निलेश मेटकर यांनी तपासास सुरूवात केली. त्याच दिवशी या घटनेचे मूळ असलेली मुख्य आरोपी सोनाली हापसे हिला ताब्यात घेवून अटक करण्यात आली. तिला राहुरी न्यायालयासमोर उभे केले असता दि. २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून दुसरा आरोपी पोलीस नाईक विशाल खंडागळे फरार आहे.

वसंतराव झावरे

लेखन सहकार्य – मनोज साळवे

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!