पोलीस टाइम्स
Uncategorized आवश्य-वाचा कथा पानभर-जगभर सामाजिक हेडलाइन

नवऱ्याच्या त्रासाला कंचन वैतागली खून करायला त्याच्याकडूनच शिकली

ज्ञानी शर्मा आणि त्याची बायको कंचनदेवी यांच्यात नेहमीप्रमाणे भांडण पेटले. ‘गप्प बस… नाहीतर तुला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुध्द करेन, आणि गळा दाबून जीव घेईन’ अशी धमकी ज्ञानीने दिली. हे ऐकून कंचनच्या डोक्यात एक कल्पना चमकली. कंचन ज्ञानीची चौथी बायको होती, त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती. तो तिच्या काहीच कामाचा नव्हता, निव्वळ त्रास द्यायलाच होता. त्याच्याबरोबर रहायचे म्हणजे जीव मुठीत धरूनच जगावे लागत होते. आता जणू त्यानेच तिला एक मार्ग दाखवला होता.

०००

बिहार राज्यातील खगडीयामधील पनसलबा हे छोटे गाव. गाव लहान असले तरी शेती आणि शेतीपूरक व्यवसायामुळे समृध्द आहे. बहुतांशी लोक शेतकरीच असल्याने गावातच रहातात. याच गावात ज्ञानी शर्मा रहात होता. ज्ञानी सुरूवातीपासूनच उधळ्या स्वभावाचा असल्याने नेहमीच कोणाची ना कोणाची उसनवारी, उधारी त्याने घेतलेली असायची. कामचुकार, उर्मट, उध्दट असणार्‍या ज्ञानीपासून सारे चार हात दूरच रहात होते. बायकांबाबतीतही तो तसा बरा नव्हता. त्याची नजर भावाच्या बायकोवरच होती. तो तिच्यावर टपून बसला होता. जणू त्याचे नशिब जोरावर असल्यासारखे होते. भावाचे निधन झाले आणि भावजय विधवा झाली. ती एकटी पडली. ही संधी साधत त्याने तिच्याशी सलगी केली. विधवा भावजयीशी लग्न करण्याची त्याने तयारी दाखवली, तेंव्हा घरच्यांना, नातेवाईकांना बरे वाटले. त्यांनी लगेचच संमती दर्शवली आणि त्याने वहिनीशी लग्न केले. आतापर्यत ती भावाची बायको म्हणून वावरत होती, ती आता ज्ञानीची बायको म्हणून वावरू लागली. तिला ज्ञानापासून चार मुले झाली, पण नंतर तिचे आजारपणाने निधन झाले. मग ज्ञानीने एका तरूणीशी दुसरा विवाह केला. तिच्याशी त्याचे ङ्गार दिवस पटले नाही. तिच्याशी वादावादी सुरू असतांनाच त्याने तिच्या बहीणीला जवळ केले. साली आधी घरवाली म्हणत त्याने मेव्हणीशी विवाह केला. या लग्नाने त्याला ङ्गटका बसला. तिसरी बायको आली, पण दुसरी एका तरूणाचा हात धरून पळून गेली. बायको पळून गेल्याने ज्ञानी चिडला होता, पण त्याचे काही चालले नाही. घरात वादावादी होऊ लागली होती, त्यामुळे तिसरी बायकोही पळून गेली. दोन बायका पळून गेल्याने ज्ञानीला मोठा धक्का बसला होता. त्याने पुन्हा लग्नाची तयारी सुरू केली. वयाची चाळीशी पार केलेला ज्ञानी गावात बदनाम होता. व्यसनी, कर्ज काढून चैन करणारा ज्ञानी चांगला पती होऊ शकत नाही असेच लोक म्हणत होते. त्याला कोणाचीच पर्वा नव्हती. तो लग्नासाठी मुली शोधत होता. एखादी कोवळी पोरगी बायको म्हणून मिळावी यासाठी त्याने अनेक ठिकाणी चाचपणी केली. यातच कंचन त्याच्या गळाला लागली.

कंचन अवघी विशीची होती, पण घरची गरीबी असल्याने तिच्या आई-वडीलांना तिच्या लग्नाची काळजी होती. त्यांची काळजी दूर करण्याचे आश्‍वासन ज्ञानीने दिले. गावातीलच असल्याने मुलगी जमीन-जुमला असणार्‍या घरात जाणार याचे तिच्या आई-वडीलांना अप्रुप वाटले. वय जास्त असले तर काय होतेे, असा विचार करून त्यांनी लग्नाला होकार दिला. विशीची कंचन चाळीशी पार केलेल्या ज्ञानीची बायको बनून आली. चांगले घर, जमीन-जुमला असला तरी म्हातारा नवरा असल्याने कंचनचे मन नाराज होते. ती नाराज मनानेच सासरी नांदायला आली. घरात लहान-लहान चार मुलांची जबाबदारी तिच्यावर पडली. नवर्‍याबरोबर सुखाच्या रात्रीची स्वप्न पहाणार्‍या कंचनची तिथेही निराशा झाली. दोन-चार मिनिटातच तो शांत होत होता. त्याच्यासाठी त्यात काहीच नवीन नसले तरी तिच्यासाठी मात्र ते सुखाचे क्षण खूपच महत्त्वाचे होते. ती तरूण होती, नवयौवनाला सुखावेल असे तो काहीच करू शकत नव्हता. त्यामुळे घरातील, शेतातील कामे करणे, सवतीची पोरे सांभाळणे हेच तिच्या नशिबी आले. निराश मनाने ती आयुष्य कंठत होती. तिच्या निरस जीवनात गावातीलच एका तरूणाने रस भरला.

ती त्याच गावचीच असल्याने तिची गावात सर्वांशी ओळख होती. यामध्ये तिच्या वयाचे तरूणही होते. यातीलच एक तिच्या मनात भरला होता. तोही तिला जाता-येता न्याहाळत होता. ती भुकेली आहे हे त्याने हेरले होते, त्याची कामुक नजर तिच्या अंगावरून ङ्गिरू लागली. ही नजर तिनेही ओळखली. तिलाही तो आवडत होता. ती हसून त्याच्याकडे पाहू लागल्याने त्याला चेव चढला. त्याने लगेचच पुढचे पाऊल टाकले. त्याने तिला एकटीला शेतात गाठले. ज्ञानी शेतात न जाता तालुक्याच्या गावी जात होता, रिकामटेकडा चैनी करत ङ्गिरत होता. बायको एकटी शेतात राबते याचे त्याला काहीच वाटत नव्हते, पण ती एकटी शेतात असते ते त्या तरूणाला समजले होते. ही संधी साधून त्याने तिला गाठले होते. ‘काय रे, आमच्या शेताकडे कसा आलास तू?’ कंचनने जरा मोठ्या आवाजातच विचारले. तसा तो वरमला, ‘काही नाही सहजच. तू एवढ्या दुपारी काय करतेस?’ ‘शेतातली काम संपतात काय कधी? बायकांनाच माहित, तुम्ही पुरूष काय ङ्गिरायच्याच कामाचे.’

‘असं नाही गं, मी करतो काम, तुला काय मदत करू का?’

ती हसली, म्हणाली, ‘मला काय मदत करणार?’

‘तू सांगून तरी बघ, तू सांगशील ते करीन.’

‘मी तुला काम सांगितलेल, माझ्या नवर्‍याला कळलं तर..?’

‘त्यात काय आहे, तो कुठं काय करतोय?’

‘म्हणजे रे,,,’ तिने डोळे वटारले.

‘तसं नाही, नेहमी तू एकटीच राबतांना दिसतेस ना, म्हणून म्हणालो.’

‘हम्म, ते खरं आहे, तो कोणत्याच कामाचा नाही.’

‘म्हणून म्हणतोय मला सांग, मी करतो बघ सगळं’

ती हसली. तो तिच्याशी गप्पा मारत थांबला. त्याच्याशी बोलण्यात तिचा वेळ कसा निघून गेला हेच कळले नाही. काम आवरून ती घरी परतली, पण शेतातला त्याचा सहवास तिच्या मनात रेंगाळत होता. दिवसांमागून दिवस जात होते. ती त्याच्या बोलण्यात गुंतत होती. ती जाळ्यात सापडल्याने तोही खुशीत होता. तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते. शेतातील कामाची लगबग सुरू होती. अचानक पावसाची रिपरिप सुरू झाली. पहाता-पहाता कंचन चिंब भिजली. तो तरूणही शेतात आला.

‘कसला पाऊस आलाय’ असे म्हणत तिच्याजवळ येऊन थांबला. अंगावरचे कपडे भिजल्याने तिच्या अंगाला चिकटले होते. तिच्या घाटदार अवयवांची गोलाई नजरेत भरत होती. तिच्या कमनीय देहाचे दर्शन तो घेत होता. ती म्हणाली, ‘अचानक पाऊस आला रे त्यामुळे भिजले.’

‘होय तर…’ त्याने तिच्या सुरात सुर मिसळला.

‘खूप थंडी वाजतेय रे.’

‘ऊब देऊ का?’ डोळे मिचकावत त्याने विचारले

ती लाजली. अंग चोरत ती शेतातील घरात पळाली. तिने दार उघडेच ठेवलेले, हे पाहून तो धाडस करून त्या घरात गेला. शेतातील दोन खोल्याचे घर, सामानसुमानाने भरलेले होते. बाजूला एक खाट होती. खाटालगत कंचन उभी होती. साडीचा पदर बाजूला झाला होता. तो आत आला तरी तिने पदर सावरला नाही. त्याच्यासमोरच ती ब्लाऊज अंगातून काढू लागली. त्याची कानशिल तापू लागली. तिने ब्लाऊज बाजूला केला आणि तिचे गोलाकार स्तनयुगुल मोकळे झाले. त्याचा श्‍वासोच्छ्वास वाढू लागला. ती त्याच्या नजरेला नजर भिडवत आव्हान देत होती. त्याच्यातील पुरूष जागा झाला, तो एका क्षणात तिच्या जवळ पोहचला. दुसर्‍याच क्षणी तिला त्याने मिठीत आवळले. दोघांनाही घाई झालेली. पहाता-पहाता दोघांचीही वस्त्रे बाजूला झाली. एका परक्या तरूणाच्या मिठीत कंचन आवळू लागली होती. तो पिसाटल्यासारखा तिच्या शरीरावर चुंबनांचा वर्षाव करत होता. स्तनांशी खेळत होता. भिजलेल्या अंगातील थंडी गायब झाली होती. तिचे अंग तापू लागले. तिच्या गरम श्‍वासाने तो अधीर झाला. पहाता-पहाता तिला बाजूच्या खाटेवर झोपवून तो तिच्यावर स्वार झाला. इतका रानटी अनुभव ती पहिल्यांदाच घेत होती. किती घाई होती त्याला. इतक्या घाईतही तो तिच्याशी एकरूप झाला. तिच्या शरीरात वासनेचा आगडोंब उसळला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत कंचन परपुरूषांबरोबर समागम करत होती. तिचा भडकलेला कामाग्नी त्याने प्रेमरसाने शांत केला, पण ही आग विझण्यासारखी नव्हतीच. वारंवार आगीचा भडका उडत होता, आणि तो आग शमवण्यासाठी हजर होता. आता ती सुखात होती.

प्रियकराकडून ती मनसोक्त शरीरसूख घेत होती, त्यामुळे आता तिने नवर्‍याला विचारणेच बंद केले. तोही तिची जास्त ङ्गिकीर करत नव्हता. ती बिनधास्त होती. ती मोकळेपणाने गावात ङ्गिरत होती. बचतगटांत सहभागी झाली. बचतगट हा केवळ बहाणा होता. त्या नावाखाली ती तालुक्याच्या शहरी भागात जात होती. तिथे तिचा प्रियकर तिला लॉजवर नेऊन मनसोक्त भोगत होता. ती खुश होती, शिवाय तिच्या हातात आता पैसेही असायचे. ती नवर्‍याला दारूला पैसे देत होती, त्यामुळे नवराही खुश झाला. तिचे शौक वाढत गेले. ङ्गिरणे वाढत गेले. गावात बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो ङ्गायनान्सच्या योजनांनी शिरकाव केला आहे. कर्ज पुरवठा करणार्‍या या ङ्गायनान्स कंपन्याकडून महिलांना पैसे दिले जातात. यामध्ये कंचननेही पैसे उचलण्यास सुरूवात केली. गावात पत असल्याने तिला कर्ज मिळत गेले. ती आणि तिचा नवरा कशाचीही काळजी न करता कर्ज काढून चैनी करत होते. पहाता-पहाता त्यांच्या अंगावर १५ लाखाचे कर्ज झाले. दुसरीकडे कंचन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काय उद्योग करते, हेही ज्ञानीला कळले होते. आपली बायको परपुरूषाशी संबंध ठेवते हे पाहून त्याचे माथे भडकले होते, त्यामुळे आता घरातील भांडणात वाढच झाली होती. नवरा-बायकोचे अजिबातच पटेनासे झाले होते. रोजच भांडण होत होते. १५ लाखाचे कर्ज ङ्गेडा असा तगादा ती नवर्‍याकडे लावत होती, तर ज्याच्याकडे जाऊन मजा करतेस, त्याच्याकडून पैसे घे, असे ज्ञानी सांगत होता. या भांडणाला शेवट नव्हता. त्यांच्या ८ वर्षाच्या संसारातील बहुतेक काळ भांडणातच गेला होता, त्यामुळे त्यांच्यातील भांडणाचे कोणालाच काही वाटत नव्हते.

तिचे अनैतिक संबंध आणि ङ्गायनान्समधून काढलेले १५ लाखाचे कर्ज या दोन विषयावर गुरूवार दि. २६ नोव्हेंबर २०२० पुन्हा त्या दोघात वाद सुरू झाला. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात तो तिला म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको, बाहेरची भानगड बंद कर नाहीतर ठार मारून टाकेन.’ ‘मला ठार मारण्याइतकी ताकत आहे का तुमच्यात?’ असे उलट तिने विचारले.

‘अलिकडे जास्तच बोलायला लागली आहेस तू, पण तुझा आवाज बंद केलेलाही तुला कळणार नाही’ असे त्याने धमकावले.

‘मारा बघू, कसं मारताय ते मला बघायचचं आहे’

‘तू जास्त ताकत दाखवू नको. तुला झोपेच्या गोळ्या खायला घालीन. मग तू बेशुध्द पडलीस ती तुझा गळा दाबून ठार मारेन आणि प्रेत घरातच पुरून टाकेन, कोणालाच काय कळणार नाही.’ त्याने जणू प्लॅनच तिला सांगितला. त्याचे हे बोलणे ऐकून ती शांत झाली, पण तिच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू झाला होता. जो प्लॅन ज्ञानी तिला मारण्यासाठी आखत होता, त्याच प्लॅनने त्याचा काटा काढला तर असा विचार तिच्या मनात येऊ लागला. तशी ती कामाला लागली. नवर्‍याची ब्याद कायमची संपवायची या विचाराने तिने त्यानेच सांगितलेल्या प्लॅनवर काम सुरू केले. तिने औषधाच्या दुकानातून झोपेच्या गोळ्याचे पाकीट आणले. आता ती संधीची वाट पाहू लागली. शनिवार दि. २८ रोजी तो घरी आला. जेवणखाण करून तो झोपी जाण्यासाठी खाटेवर पडला. झोपण्याआधी त्याने तिच्याकडे पाणी पिण्यासाठी मागितले. ही संधी तिने साधली. तिने पाण्यात झोपेच्या ५ गोळ्या टाकल्या. ते पाणी ज्ञानीला दिले. ज्ञानी ते पाणी प्यायला आणि काही वेळात तो बेशुध्द झाला. कंचन तयारीतच होती. तिने आजूबाजूचा अंदाज घेतला. सगळीकडे शांतता होती. ही संधी साधून ती त्याच्या उरावर बसली. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. तिने त्याचा गळा जोराने आवळण्यास सुरूवात केली. पूर्ण ताकतीने तिने त्याचा गळा आवळला. काही वेळानंतर त्याचा श्‍वास थांबल्याचे तिच्या लक्षात आले. आता काम ङ्गत्ते झाले होते. आता पुढचे पाऊल टाकायचे होते. त्याचा मृतदेह घरातच पुरायचा होता.

ती खोलीतील बेडखालीच खड्डा काढण्यासाठी धडपडू लागली, पण ज्ञानी जाडजुड होता. त्याला उचलून खड्डयात टाकणे तिला शक्य नव्हते. तसेच त्याच्यासाठी मोठा खड्डा खणावा लागणार होता, पण त्याचा मृतदेह बाजूला सारणेही कठीण होते. त्यामुळे तिने त्याला पुरण्याचा प्लॅन बदलला. मग तिने मृतदेह धान्याच्या ड्रममध्ये भरण्याचा विचार केला. त्या पत्र्याच्या बॅरेलमधील धान्य तिने ओतून रिकामे केले, पण त्यातही ज्ञानीचा मृतदेह भरणे तिला जमेना. आता काय करावे याचाच विचार ती करत बसली. दिवस उगवला, पण ती खोलीतून बाहेर आली नाही. तिची चार वर्षाची मुलगी आत-बाहेर करत होती. कंचन तब्बल ३० तास मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचाच विचार करत होती. तिला मार्ग सापडत नव्हता. तोवर मृतदेह सडून दुर्गंधी पसरू लागली होती. मग मात्र तिने बेलदौर पोलीस ठाणे गाठले. चार वर्षाच्या मुलीसह ती पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने नवर्‍याचा खून केल्याची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना ज्ञानीचा मृतदेह सापडला. कर्ज ङ्गेडण्यासाठी पती टाळाटाळ करत होता, त्यामुळे देणेकर्‍यांचा मला त्रास होता होता. या रागातून खून केल्याचे तिने सांगितले. तर तिचे अनैतिक संबंध होते, त्यात अडसर ठरत असल्याने तिने पतीचा खून केल्याचा आरोप पतीच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्ञानी शर्मा (वय ४८) याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी कंचनदेवी (वय २७) हिला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!