पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

आधी मैत्री केली, उसने पैसे देऊन मिंधे केले! त्याच्यासमोर त्याच्या पत्नीला इम्तीयाजने भोगले!

पुणे-हडपसर

समाजात काही लोक अत्यंत नीच प्रवृत्तीचे असतात. मैत्रीच्या बहाण्याने एखाद्याशी जवळीक करतात, त्याला अडचणीत मदत करून माणूसकी असल्याचे दाखवतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मनात वेगळाच डाव असतो. समोरचा जाळ्यात सापडला की ते आपले रूप उघड करतात, तेंव्हा मात्र त्याच्यावर विश्‍वास ठेवणार्‍यांवर पश्‍चाताप करण्याची वेळ येते, पण तोवर वेळ निघून गेलेली असते. पुण्यातील हडपसर भागात पर्स विकणार्‍या फेरीवाला इम्तियाज शेख याच्यासोबत मसालेवाल्याची ओळख झाली. दरम्यान व्यवसाय वाढवण्यासाठी मसालेवाल्याला 40 हजार रूपयांची गरज होती, तेंव्हा इम्तियाज शेख याने त्याला उसने पैसे दिले. हे पैसे मसालेवाला परत करू शकला नाही, तेंव्हा नीच पर्सवाल्याने थेट त्याच्याकडे त्याच्या पत्नीचीच मागणी केली. पैसे वसुल करण्यासाठी तो मसालेवाल्याच्या बायकोवर बलात्कार करू लागला. इतकेच नाही तर त्याने हे सगळे कृत्य घरातील सी.सी.टी.व्ही.मध्ये चित्रीत करून व्हीडीओ बनवला. त्याआधारे तो त्या दाम्पत्याला ब्लॅकमेल करू लागला. नीचपणाचा कळस गाठणार्‍या या घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment