पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव पानभर-जगभर महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

सुखी संसाराचा त्याचा कळला नाही मंत्र! बायकोबरोबर सेक्ससाठी आणले यंत्र!

ती पंचविशीतील तरूणी. तिने ऑनलाईन अनुरूप पती शोधला. लग्नही केले. पहिल्याच रात्री तिचा पती स्टॅमिना वाढवण्याची गोळी खातांना दिसला. ती मनातून घाबरली, पण त्या गोळीचा काहीच ङ्गायदा झाला नाही, तिचा पती तिला कोणतेच सुख देऊ शकला नाही. ती निराश झाली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. याचा गैरङ्गायदा घेत त्याने तिच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने अत्याचार करून विकृत आनंद घेण्यास सुरूवात केली.

०००

चार-चौघात ठळकपणे खुलून दिसणारी कामिनी लग्नाच्या वयात कधीच आली होती. ती पंचवीस वर्षाची झाली होती. कामिनी दिसायला देखणी व त्यातल्या त्यात बॅकेत जॉब करणारी अर्थात कमावती होती. ब्युटी अलॉंग वुईथ नॉलेज असे तिचे वर्णन करता येईल. रूपवान कामिनीला सरस्वती प्रसन्न झाली होती. विद्या तिच्या अंगी बहरलेली होती. याशिवाय परमेश्वरने तिला देखण्या रूपाचा अनमोल ठेवाही दिला होता. विना मेकअप, विना ब्युटीपॉर्लर तिच्या रूपाचा झरा खळखळून वहात होता.

लग्नायोग्य कामिनीच्या लग्नाचा योग कधी जुळून येईल याची चिंता तिच्या पिताश्रींना लागून होती. आपल्या कन्येच्या नशिबात कोणत्या गावचा राजकुमार आहे? त्याचे उत्पन्न भरपूर असेल का? त्या राजकुमाराकडे आपली कन्या सुखी राहील का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना नेहमी पडत होते. त्यांची चिंता म्हणजे आपली चिंता असे समजून कामिनी स्वत:च तिच्यासाठी ऑनलाईन वरसंशोधन करत होती. संकेतस्थळावर ती दररोज व्हिजीट देत असे. तिचा स्वप्नातील आणि वडीलांच्या मनाला समाधान देणारा राजकुमार ती स्वत:च शोधत होती.

जळगाव शहरातील एका सुसंपन्न कॉलनीत कामिनी आपल्या आई-वडीलांसह रहात होती. या संकेतस्थळावरील एक स्थळ सर्वांना योग्य वाटले. तो उपवर तरूण जळगाव शहरातीलच रहिवासी होता. संकेत स्थळावरील उपवर तरूणाने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वार्षिक उत्पन्न दहा लाख होते. त्या उपवर तरूणाचे कोचिंग इन्स्टिट्युट असल्याचे दर्शवण्यात आले होते. कामिनी जळगाव शहरातील रहिवासी होती. संकेत स्थळावरील त्या उपवर तरूणाचे आई-वडीलांसह रहाण्याचे ठिकाणही जळगाव होते. अलिखीत प्रथेनुसार कामिनीच्या जवळच्या नातेवाईकांनी त्या स्थळाचा कानोसा घेवून माहिती घेतली. दिलेल्या पत्त्यावर त्या उपवर तरूणाचे घर आणि कोचिंग इन्स्टिट्युट असल्याची तसेच आर्थिक सुबत्ता असल्याची नातेवाईकांची खात्री झाली. तसेच तो तरूण कामिनीला मनोमन आवडला, त्यामुळे तिने या स्थळाला होकार दिला. मध्यस्थ नातेवाईकांमार्फत ओळखी-पाळखी काढून निमंत्रण देत पुढील पुरक बोलणी करण्यात आली.

उपवर तरूणाची आर्थिक सुबत्ता लक्षात घेवून आपली मुलगी कामिनी सुखात राहील असा विचार तिच्या पालकांनी केला. दोन्ही पक्षाकडील मंडळी विवाहाच्या बोलणी प्रसंगी जमली. यावेळी समाजाच्या चालीरीतीनुसार तोळ्याच्या रूपात सोने व रोखीच्या रूपात लाखातील रक्कम आणि संसारोपयोगी वस्तू असा हुंडा वरपक्षाला देण्याचे ठरले. हा हुंडा जवळच्या चार नातेवाईकांसमक्ष वधू पक्षाने वर पक्षाला दिला. नियोजित तारखेला कामिनीचे लग्न लॉकडाऊन काळात निवडक नातेवाईकांच्या हजेरीत झाले.

लग्नानंतर कामिनी व तिच्या पतीने सत्यनारायणाची पुजा-अर्चा केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी घरातच मधुचंद्राच्या रात्रीची बेडरूममध्ये तयारी अर्थात सजावट करण्यात आली.

त्या रात्री कामिनी मनोमन खुष होती. ज्या रात्रीची प्रत्येक विवाहित तरूणी आतुरतेने वाट बघत असते ती रात्र आणि तो क्षण जवळ आला होता. ती सजवलेल्या बेडरूममध्ये गेली. मुलायम बेडवर बसली आणि तिला तिच्या मनातल्या राजकुमाराची प्रतिक्षा होती. तो आला. तिला आवडलेला तिचा पती. देखणा, रूबाबदार, श्रीमंत आज तो तिचा होणार होता. तिने त्याच्यासमोर दुधाचा ग्लास धरला. त्याने तिच्याकडे हसत बघत तो ग्लास घेतला आणि खिसातून गोळ्यांचे पाकिट काढले. त्यातील गोळी काढून तो तोंडात टाकू लागला. हे तिला विचित्र वाटले. तिने त्याला त्याबद्दल विचारले, तेंव्हा ती प्रणयातील स्टॅमिना वाढवायची गोळी असल्याचे तिला समजले. ती सुशिक्षित होती, तिला हे माहित होते. तिने नवर्‍याला विरोध केला. आपण तरूण असतांना मधुचंद्राच्या रात्री स्टॅमिना वाढवायची गोळी कशाला असा तिचा सवाल होता. जे काही करायचे ते प्रेमाने, नैसर्गिक पध्दतीने का करायचे नाही असे तिने विचारले. तेंव्हा डोळे मिचकावत तो म्हणाला, या गोळीने ताकत वाढते, स्टॅमिना वाढतो, रात्रभर संभोग केला तरी पुरूष शांत होत नाही. या गोळीमुळे प्रणयाची धुंदी वाढते. एक्स्ट्रॉ टाईम अर्थात प्रणयाचा जादा टाईम अर्थात बोनस वेळ मिळतो. स्त्री कंटाळून जाईल मात्र पुरूषाची धुंदी कमी होणार नाही अशी या गोळीची करामत असते.

बोलत-बोलत त्याने ती गोळी तोंडात टाकली. तरूण पती, लग्नाची पहिली रात्र, त्यातच त्याने खाल्लेली स्टॅमिना वाढवण्याची गोळी यामुळे कामिनी अस्वस्थ होती. तिला काय करावे हेच कळेना. तिच्या पतीने तिला झडप घालून बेडवर पाडले. तिच्या शरीराला तो रगडू लागला. कुस्करू लागला. तिच्या ओठांचे, गालाचे चावे घेत होता. तिच्या स्तनांना कुस्करत होता. त्याचे हे वर्तन तिच्यासाठी वेदनादायीच होते, पण तो अक्षरश: तिच्यावर तुटून पडला होता. त्याचा हा खेळ सुरू असला तरी प्रत्यक्षात मात्र त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते, त्यामुळे दोन-तीन मिनिटातच त्याच्यात शिथिलता आली. गोळी घेऊनही त्याची क्षमता अजिबात वाढली नाही. जी नैसर्गिक क्षमता होती तीदेखील खालावली होती. तो पूर्णपणे थंड होता. हे पाहून तिला राग अनावर झाला. तिने लाज बाजूला ठेऊन त्याला विचारले, ‘तुम्ही पुरूषात नाही काय?’

 तिच्या बोलण्याचा त्याला राग आला. ‘तू माझ्या पौरूषत्वावर संशय घेते’ असे म्हणत त्याने तिच्यावर हात उचलला. सुहागरात्र असतांना प्रेमाचा अंकुर  फुटण्याऐवजी या जोडीत वाद सुरू झाला. तिला दोन तडाखे देऊन तो बाजूला बसला. काही वेळातच त्याला झोप लागली. ती मात्र रात्रभर तळमळत होती. आपण काय विचार केला होता आणि काय झाले असे म्हणत ती पाय दुमडून झोपी गेली. हा प्रकार कोणाला सांगावा की नको याचा ती विचार करत होती. काय करावे हे तिला सुचत नव्हते. लग्न तर झाले आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्यावे, पतीशी बोलून काहीतरी मार्ग काढावा असा विचार करून ती गप्प राहिली,  

पण दुसर्‍या दिवशी तिच्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची तिला जाणिव नव्हती. त्या रात्री ती बेडरूममध्ये गेली, तर तिच्या पतीने तिच्यासोबत समागम करण्यासाठी एक कृत्रिम यंत्र (एक्स्टर्नल ऑर्गन व्हायब्रेटर) आणले. हे यंत्र लावून तो तयार होता. तिचा विरोध मोडून काढत त्याने तिला झोपायला लावले आणि त्या यंत्राच्या सहाय्याने तो समागम करू लागला. ते यंत्र तिच्या गुप्तांगात शिरल्याने तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. ती तडङ्गडू लागली. तसा त्याला आनंद वाटू लागला. ती रडत होती, तिचे हाल पाहून तो हसत होता. या यंत्राचा वेग वाढला, तशा वेदना असह्य होऊ लागल्या. तिच्या तोंडातून किंकाळ्या बाहेर पडू लागल्या. ती जोरजोरात आक्रोश करू लागली. तसा तो थांबला. त्याने ते यंत्र बाहेर काढले. तिच्या गुप्तांगाला दुखापत झाली होती. ती रडतच खोलीतून बाहेर आली. तिच्या आवाजाने घरातील लोकही बाहेर आले होते. तिने नवर्‍याने केलेला प्रकार सासूला सांगितला. खरंतर मुलाचे हे पाशवी वागणे कोणत्याही आईने खपवून घेतले नसते. पण येथे उलटाच प्रकार झाला. तिने मुलाला काहीच न बोलता सूनेलाच ङ्गैलावर घेतले. ‘माझा मुलगा सांगेल तसे कर’ असे म्हणत तिला गप्प बसण्यास सांगितले.

मग मात्र त्याचे ङ्गावले. सासूने खोलीत जायचा आदेश दिल्याने ती चुपचाप खोलीत गेली. ती खोलीत येताच पतीने तिला बळजबरी विवस्त्र होण्यास भाग पाडले. तशाच अवस्थेत त्याने तिचे कॅमेर्‍याच्या मदतीने वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही. त्याने मोबाईल व टॅबमध्ये व्हिडीओ शुटींग केले. हे व्हिडीओ शुटींग आणि फोटो त्याने त्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले. 

आता हे रोजचेच झाले होते. तो संभोग करण्यास सक्षम नव्हता, त्यामुळे तो काही ना काही वेगळेच प्रकार करत होता. त्याचा तिला प्रचंड त्रास होता होता. ती विरोध करू लागली तर तो तिला जास्तच छळत होता. या सर्व त्रासाला कामिनी वैतागली. काही दिवसांनी या फोटोसेशन आणि व्हिडीओ शुटींगच्या बळावर तो तिला त्रास देवू लागला. तोे तिला म्हटला की ‘तुझ्या आई-वडीलांनी लग्नात कमी हुंडा दिला. आता तू तुझ्या आई-वडीलांकडून पैसे घेवून ये. नाही तर मी तुझे नग्न फोटो आणि शुटींग व्हायरल करेन.’

कामिनीच्या पतीने तिच्या बँकेचा डाटा घेण्यासाठी तिला बळजबरी केली. तिचे बँक खाते त्यानेच हॅक केल्याची तिची खात्री झाली. तिच्या मोबाईल क्रमांकाला त्याने क्लोन केल्याचाही तिला संशय आला. तिच्या मोबाईल क्रमांकाचे इनकमिंग व आऊटगोईंग कॉल त्याने हॅक केले असावे अशी तिला शंका येवू लागली.

तिच्या पतीने बळजबरी तिच्या सह्या कोर्‍या स्टँप पेपरवर घेतल्याचा तिने आरोप केला. पतीसह सासरच्या मंडळींवर विविध आरोपांची यादी घेवून तिने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले.

रामानंद नगर पोलीस स्टेशनला कामिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती, सासरे, सासू, नणंद अशा चौघांविरुद्ध विविध आरोप केले. तिच्या फिर्यादीनुसार जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३३७/२० भा.दं.वि. ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४, ३७७, ४०६, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे सहकारी जितेंद्र तावडे करत आहेत.

(या कथेतील पिडीतेचे कामिनी हे नाव काल्पनिक आहे) 

– ललित खरे

1 comment

Yogesh B.Chaudhari January 7, 2021 at 11:28 am

I am very old reader of police times.

Reply

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!