पोलीस टाइम्स
Uncategorized आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

बाथरूममध्ये केली अंघोळ,तिचा काय दोष? पण ब्लॅकमेल करून तिला लुटू लागला संतोष.

माणसात एक जनावर लपलेले असते आणि संधी मिळताच ते हल्ला करून लचके तोडते. ही क्रूरता किती भयानक असू शकते याचा नमुना कोल्हापूरात नुकताच दिसला. एक विवाहित पुरूष आपल्या प्रवासी वाहनात बसला होता. तेथून जवळच एका घरातील विवाहिता अंघोळ करत होती. हे दृश्य त्याला दिसले. खरंतर त्याने तिथून दूर जायला हवे होते, पण त्याने मोबाईल काढला आणि तिचे चित्रीकरण केले. तो व्हीडीओ पाहून तो सुख मिळवू लागला. नंतर त्याने त्या व्हीडीओच्या आधारे त्या विवाहितेला ब्लॅकमेल केले. दोन वर्ष तिच्यावर बलात्कार केला, नंतर तिच्याकडे पैशाची मागणी करू लागला. किती हा अमानूषपणा. एका महिलेचा काहीही दोष नसतांना भोगायला लागलेल्या वेदनेचा हा वृत्तांत.

०००

संतोष सोळसे हा पन्हाळा तालुक्यातील माले या गावी रहातो. त्याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. घरगाडा चालवण्यासाठी सोळसे वडापचे काम करतो. तसा तो मेहनती असला तरी त्याचा स्वभाव कोणाला न पटणारा. दिवसभर वडापचे काम करून आले की, तो एक ठिकाणी आपली गाडी पार्क करून घरी जायचा. कधी-कधी गाडी चालवून दगदग झालेली असायची. मग त्या दिवसाचे सर्व काम झाले की घरी जावून निवांत जेवण करून विश्रांती घ्यायची असा त्याचा दिनक्रम. पण कधी-कधी गाडी चालवून-चालवून कंबर अवघडलेली असायची, म्हणून तो पाच-दहा मिनिटे दरवाजे लॉक करून गाडीतच बसून रहात असे. त्यानंतर तो आपल्या घरी जात होता.

परंतु दोन वर्षापूर्वी एक वेगळीच घटना संतोषच्या जीवनात घडली. त्या घटनेनंतर संतोषचे डोकेच चक्रावून गेले. आता या घटनेचा गैरफायदा घ्यायचा असे संतोषने मनात ठरवले. त्याने त्या गोष्टीचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. त्याने ते अनेक वेळा पाहून अनेक योजना आखल्या. आता जीवन थोडे रोमँटीक करायचे, मनात येईल तेंव्हा रोमान्स करता येईल. घरवाली तो घरवाली, बाहरवाली तो और लज्जतदार-मजेदार! म्हणत त्याने योजनाच आखली. आता या घटनेचा पुरेपूर फायदा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच.

काय घडले होते असे? तर…नेहमीप्रमाणे संतोष वडाप घेवून आला. दिवसभर गाडी चालवून तो चांगलाच थकला होता. सर्वत्र काळाभोर अंधार पसरला होता. अंग ठणकत होते. थोडी विश्रांती घ्यावी व मगच घरी जावे म्हणून तो तसाच गाडीत बसून होता. इतक्यात गाडीच्या बाजूला असलेल्या बाथरूमचा लख्ख असा लाईट लागला. कर्रर्र असा दरवाजा उघडला गेला आणि एका सुंदर अशा स्त्रीने बाथरूममध्ये प्रवेश केला. तिच्या हातात साडी-ब्लाऊज, परकर होता. संतोषच्या लक्षात आले की म्हणजे आता ही स्त्री अंघोळ करणार. ती अगदी स्पष्टपणे त्याला दिसत होती, परंतु हा अंधारात असल्याने तिला अजिबात दिसत नव्हता. याने लगेच आपला मोबाईल काढला. संपूर्ण बाथरूमचे कसे चित्रीकरण होईल अशा अँगलनी मोबाईल पकडला. पाहिले तर पूर्ण बाथरूमचे व्यवस्थित चित्रीकरण होणार या पद्धतीने त्याने स्वतःदेखील पोझीशन घेतली. ती स्त्री कपडे ठेवून बाहेर निघून गेली. ती जरी निघून गेली असली तरी तिने कपडे ठेवले होते, म्हणजे अंघोळ करणार हे मात्र शंभर टक्के खरे होते. हा तसाच गाडीत बसून राहिला. लगेच ती स्त्री पुन्हा गरम पाण्याचे मध्यम आकाराचे भांडे घेवून आली. तिने गरम पाणी बादलीत ओतले व पुन्हा भांडे ठेवायला बाहेर गेली. म्हणजे थोड्याच वेळा ती येणार आणि अंघोळ करणार याचे आपण स्पष्टपणे चित्रीकरण करणार म्हणून संतोष खूपच उत्सुक होता. त्याने पुन्हा पूर्ण बाथरूम कॅमेर्‍यात येते की नाही हे तपासून पाहिले. आता फक्त त्या स्त्रीने बाथरूममध्ये प्रवेश करायचा की चित्रीकरण सुरू.

थोड्याच वेळात त्या स्त्रीने बाथरूममध्ये प्रवेश केला. नंतर आपल्या अंगावरचे कपडे काढून तिने एका कोपर्‍यात ठेवले. ती पूर्ण नग्नावस्थेत अंघोळ करू लागली. संतोषने मोबाईल न हलवता तिच्या अंघोळीचे चित्रीकरण चालूच ठेवले. अगदी पुन्हा स्वच्छ साडी नेसेपर्यंतचे चित्रीकरण करून ठेवले. अंघोळ संपवून ती स्त्री बाथरूमचा लाईट बंद करून निघून गेली. संतोषने ते चित्रीकरण पाहिले. खूपच मजा आली. पुन्हा-पुन्हा ते चित्रीकरण पहावे असे त्याला वाटत होते. तिचे रूप पाहून पाहून त्याच्या मनात एक वाईट विचार आला. जो विचार त्या तरूणीच्या आयुष्याला सुरूंग लावणारा होताच, शिवाय संतोषच्या आयुष्याचीही माती करणारा होता. पण त्याला याची जाणीव नव्हती. त्याने विचार केली की या चित्रीकरणाच्या आधारे तिला धमकी द्यायची. ‘मला तू शरीरसुख दे नाही तर हे चित्रीकरण सार्‍या गावभर करणार. मग ती अब्रूच्या भीतीने तयार होईल. एकदा का शरीर सुख दिले की पुन्हा-पुन्हा अगदी पाहिजे तेंव्हा मजा घेता येईल.’ या विचाराने त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि घरी निघून गेला.

त्या स्त्रीचे दुकान असल्याने तीदेखील दिवसभर दुकानात काम करत असल्याने रात्री अंघोळ करत असे. एके दिवशी संतोषची बायको घरी नव्हती, तर ती विवाहिता दुकानात एकटीच होती. ही संधी साधून तो दुकानात गेला. मुद्दामच थोडे सामान खरेदी केले आणि कोणी नसल्याचे पाहून मुख्य विषयालाच हात घातला. ‘दुकान बंद केल्यावरच तू अंघोळ करतेस?’ हे ऐकल्यावर ती स्त्री एकदम गडबडली, कारण तिच्यासाठी वेगळाच प्रश्‍न होता.

‘काय…?’

‘काय नाही. हे बघ हा माझा मोबाईल. यात तू परवा अंघोळ करत होती ना त्याचे मी शुटींग केले आहे….’

‘काय! आधी ते त्या मोबाईलमधून काढून टाक बघ…’

‘काढून टाकणार की. तेसुद्धा तुझ्यासमोर…’

‘मग चल आता काढून टाक.’

‘इथं नाही. संध्याकाळी माझ्या घरी ये. मी ते डिलीटच करून टाकतो.’

‘मी येते. खरं आत्ताच्या आत्ता ते काढून टाक.’

‘तू घाबरू नको. मी तुझ्यासमोरच डिलीट मारणार, पण तू घरी ये तर खरी.’ अशा तर्‍हेने संतोष तिच्यावर शरीरसुख देण्यासाठी दबाव टाकू लागला. तू घरी आली नाहीस तर व्हॉटस्ऍप ग्रुपवर ते चित्रीकरण टाकणार अशी धमकी त्याने दिली, तेंव्हा ती गांगरली. त्याच्या घरी जावून गोड बोलून ते चित्रीकरण तेवढे डिलीट करायला लावायचे असा विचार करून ती तयार झाली. संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर त्याला भेटायचे असे ठरवले. रात्री दुकान बंद केल्यानंतर ती त्याच्या घरी गेली. त्यावेळी त्याच्या घरी कोणीच नव्हते. ‘हे बघ मी आली आहे. जे काय तुझ्या मोबाईलमध्ये आहे ते काढून टाक.’

‘टाकतो की एवढी गडबड का?’ म्हणत तो तिच्याजवळ आला. ‘हे काय करतोस?’ तिने त्याला बाजूला सारत विचारले. ‘तुला पाहिल्यापासून मी तुझ्यावर ङ्गिदा झालो गं, काय मस्त दिसतेस तू…’ ‘तू काय बोलतोस तुला कळतेय का?’ तिने दरडावले. ‘मला कळतेय गं, पण तू कशी वागतेस तुला कळतंय का?’ त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकत तिलाच विचारले. ‘तो व्हिडीओ डिलीट कर, बाकी काय सांगू नको’ तिने आपला हेका सोडला नाही. ‘डिलीट करतो, पण व्हीडीओत जे दिसले तसे दर्शन मला दे ना’ त्याचे हे बोलणे तिला असह्य वाटत होते. ‘मला जर नाही दाखवलेस तर व्हीडीओ गावातील सगळ्या लोकांना दाखवीन, घेऊ दे त्यांना पण मजा.’ असे म्हणत त्याने तिला आवळून धरले. त्याच्यासमोर तिचे काही चालले नाही. तिला ओरडताही येत नव्हते. ओरडावे तर चित्रीकरण इतरांना दाखवून आपल्या अब्रूवर हात घालणार. सार्‍या गावभर अब्रूचे धिंडवडे निघणार, तेंव्हा गप्प रहाणे तिला भाग पडले. ती गप्प राहिल्यानंतर तो चेकाळला. त्याने पहाता-पहाता तिचे कपडे उतरवले आणि बेडवर नेले. तिचे ते नागवे शरीर आता त्याच्या मिठीत होते. तो आवेगाने तिच्या शरीरावर अत्याचार करू लागला. जनावरासारखा तिच्या शरीराचे मर्दन करू लागला. काही क्षणात त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्याने तिचा गैरङ्गायदा घेत तिच्या शरीराचे लचके तोडले. ती अत्याचार सोसून चुपचाप परत आली. तिला काहीच समजत नव्हते. ती विमनस्क अवस्थेत घरी परतली. 

त्यानंतरचे काही दिवस गेले, पुन्हा एक दिवस तो तिच्या दुकानात पोहोचला. ‘हे बघ, त्या दिवशीची मॅटर काही डिलीट केली नाही. विसरून राहिली, तेंव्हा तू असं कर. दुपारच्या वेळी शेतात आमची शेड आहे तिथं ये. अगं, तुझ्यासमोरच डिलीट मारतो. तू आलीस तरच डिलीट. नाही तर मॅटर गावभर.’

‘हे बघ हे वाईट आहे. त्यादिवशी जबरदस्तीने संभोग केलास. आता मी नाही येणार. ते तेवढं मोबाईलमधून काढून टाक.’

‘काढून टाकणार की. आज दुपारी शेतात आलीस तर.’

तिचा नाईलाज झाला. ती शेतात गेली, पण त्याला धीर धरवत नव्हता. त्याने तिला शेडमध्ये नेलीच नाही. ऊसाच्या शेतातील बांधावरच त्याने तिला खाली पाडले आणि तिच्यावर बलात्कार केला.

 दोन वर्षापूर्वी केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे जोरजबरदस्तीने तिच्याविरूद्ध तिच्यापासून शरीरसुख घेत होता. असे समजते की संतोषच्या घरीदेखील या वाईट कृत्याची बातमी समजली होती, शिवाय अनेकांना या कृत्याबद्दल समजले होते, तरीही संतोषने आपले पापी कृत्य काही कमी केले नाही.

ती स्त्री गरीब होती. घर-दार चालेल एवढेच तिचे दुकान चालत होते. संतोष तिच्यापासून शरीरसुख तर घ्यायचा, पण आता त्याच्या विकृत मनात वेगळाच विचार येऊ लागला. आता तो तिला त्या क्लीपची भीती दाखवून पैसे मागू लागला. मला ५० हजार रूपये दे नाही तर तुझ्या मुलांना व नवर्‍याला ठार मारेन म्हणून धमकी देवू लागला. ज्यांना घर चालवणे मुश्किल ते पैसे कुठून देणार? त्या क्लीपची भीती दाखवून त्याने त्या गरीब स्त्रीला शरीरसुख देण्यास भाग पाडले, तेंव्हा ती पन्नास हजार रूपयेही देईल अशी समजूत संतोषची झाली. एक तर हा मोबाईलचे चित्रीकरण डिलीट करत नसे आणि वेळोवेळी तिच्याकडून सुख घेत राहिला. आता पैसे मागायला लागला. त्याला पैसे देणार तरी कुठले? या विचाराने ती त्रासून गेली. त्याने जसा दोन वर्ष गैरङ्गायदा घेत वारंवार बलात्कार केला. तसेच एकदा पैसे दिले तर तो वारंवार पैसे मागत रहाणार असे तिला वाटले. त्यामुळे आत्ताच त्याचा आवाज बंद केला पाहिजे असा विचार तिने केला. जास्त काळ अत्याचार सोसण्यात अर्थ नाही त्याला अद्दल घडवायचीच असे ठरवून तिने कोडोली पोलीस ठाणे गाठले. तिने संतोष साळसे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. गुन्ह्याची गंभीरता ओळखून कोडोली पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. पाटील व त्यांच्या टीमने लगेच संतोष सोळसेला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध गुन्हा रजि.नं. १३-२०२१ भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२(एन), ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

समाजात अशा अनेक वाईट घटना घडत असतात, तेंव्हा ज्या-त्यावेळी अशा घटनांच्याविरोधात तक्रार करावी. नाहीतर संशयित गुन्हेगार आपली आर्थिक-शारीरिक पिळवणूक केल्यशिवाय रहात नाही. खरे तर याठिकाणी या स्त्रीची चूक कोणतीच नव्हती. तिच्या नकळत तिचे शुटींग केले गेले होते. ‘कर नाही तर डर कशाला’ या म्हणीप्रमाणे ती त्याचवेळी त्याच्या वाईट वृत्तीला आळा घालू शकत होती, पण तिने घाबरून तसे केले नाही आणि ती त्याच्या वासनेला बळी पडत गेली. त्याच्या वाईटपणाला खतपाणी घालत गेली. कोणतीही स्त्री अब्रूला जास्त घाबरते हे संतोषने चांगलेच ओळखले होते, म्हणूनच त्याने त्या गरीब अबलेचा फायदा घेतला. त्याच्या घरच्यांनासुद्धा याबद्दल माहिती होती असे समजते, पण तेही गप्प बसले होते, याचा अर्थ तेही या गुन्ह्यात भागीदार होतेच असेच म्हणावे लागेल. अशा गुन्हेगारी वृत्तीला वेळीच ठेचावे लागते, नाहीतर पुढे-पुढे हे लोक मुर्दाड होत रहातात आणि गुन्हेगारी फोफावू लागते.

या घटनेचा अधिक तपास कोडोली पोलीस ठाणे इन्चार्ज ए.पी.आय. काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व त्यांची टीम करत आहे.

-अजय भोसले

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!