पोलीस टाइम्स
इतर बातम्या कथा सामाजिक हेडलाइन

3 डी प्रिंटरद्वारे तयार केले पेशीयुक्त, रक्तवाहिन्या युक्त सशाचे हृदय!

सध्याचे युग हे डिजीटल युग आहे. सध्या 3डी प्रिंटरद्वारे आपल्याला हवी वस्तू ुलगेच तयार करता येते. ही तशी जुनीच गोष्ट झाली आहे, कारण आता आणखी एक नवीन शोध लागला आहे तो म्हणजे 3 डी तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव तयार करण्याचा.

इस्त्रायलमधील संशोधकांनी यात यश मिळवले असून मानवी पेशी आणि रक्तवाहिन्याद्वारे त्यांनी 3 डी तंत्रज्ञानाने सशाचे हृदय बनवले आहे. तेल अविव युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी नुकतीच एक पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा केली. यामध्ये त्यांनी सांगितले की एका रूग्णाची बायोप्सी (पेशी) घेवून त्याचे रूपांतर 3डी प्रिंटररच्या शाईत केले. त्यानंतर त्या पेशंटच्या पेशी, रक्तवाहिन्या यापासून हे हृदय तयार केले.

हे तयार केलेले हृदय त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. याबद्दल या संशोधकांनी सांगितले की याआधीही 3 डी प्रिंटरने हृदयाच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत, पण असे पेशींनी, रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले खरेखुरे हृदय त्यांनी पहिल्यांदाच बनवले आहे. यामध्ये अजूनही काही त्रुटी आहेत, पण  पुढील 10 वर्षात आपण 3 डी प्रिंटरद्वारे असे हृदय बनवू शकू असा विश्‍वास व्यक्त केला. याचा अर्थ पुढील 10 वर्षात असे प्रिंटर तयार होतील की जे मानवी अवयव तयार करून देतील.

भविष्यात हे  ऑर्गन प्रिंटर्स मानवी जीवनात बर्‍याच उलथापालथी घडवून आणतील. कदाचित मनुष्य प्राण्याचा जन्मही यातूनच होईल की काय याची भीती वाटते..

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!