पोलीस टाइम्स
Uncategorized कथा कोकण विभाग महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

प्रेम नाकारल्याने पिसाटली नार! प्रियकराला संपवण्यास झाली तयार!

ती बँकेत मॅनेजर. तो महापालिकेत सबइंजिनिअर. दोघांचे सूत जमले. मौजमजा केली, पण लग्न मात्र केले नाही. लग्नानंतर पुन्हा ते एकत्र आले. इश्काचा खेळ खेळू लागले. काही काळानंतर मात्र तो कंटाळला. तिला टाळू लागला. या प्रकाराने ती संतापली. ‘माझा नाहीस, तर कोणाचाच होऊ देणार नाही’  असे सांगतच जणू तिने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्याला मारण्यासाठी थेट ओरिसामधून कॉन्ट्रक्ट किलर बोलवला. त्याला लाख रूपयाची सुपारी दिली. तो मारेकरीही उच्चशिक्षित होता. तो मुंबई आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तिलाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे प्रियकराचा जीव तरी वाचला, पण या दोघांचेही संसार कसे वाचणार?

०००००

देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे मुंबई. मुक्त जीवनशैलीचा आनंद देणार्‍या या शहराचा मोह अनेकांना होतो, त्यामुळे देशभरातील अनेकांची पावले या मायानगरीकडे वळतात. या मुक्त वातावरणात उंच भरारी घेतात. मनासारखे जगतात, पण आपल्या मनासारखे जगतांना इतरांच्या मनाचा विचारही करावा लागतो, याचा काही जणांना विसर पडतो. सगळे काही आपण म्हणू, करू तसेच झाले पाहिजे असे काही जणांना वाटते. ते इतरांना आपल्या तालावर नाचवू पहातात. यातही मनमौजी तरूणींची संख्या जरा जास्तच आहे. कोणीही आपल्या सौंदर्यावर ङ्गिदा होईल, आपल्या मर्जीप्रमाणे वागेल असा काही तरूणींचा समज होतो. त्यातून त्या बेधुंद वागू लागतात. हे वागणे काही वेळा अंगलट येऊ शकते. याचा नमुना मुंबईतील एका तरूणीला बघायला मिळाला. ती तरूणी मुंबईच्या नामवंत बँकेमध्ये गेल्या चार वर्षापासून असिस्टंट मॅनेजर आहे. मोठ्या पदावर काम करणार्‍या या तरूणीला कशाचीच काळजी करण्याचे कारण नव्हते. सारी सुख तिच्यासमोर हात जोडून उभी होती. ती तरूण होती, आर्थिकदृष्टया संपन्न होती, तिला कशाचीच ङ्गिकीर नव्हती. या तरूणीची ओळख एका तरूणाशी झाली. हा तरूणही उच्चशिक्षित होता. मुंबई महानगरपालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसमध्ये सबइंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. अर्थात तोही चांगलाच होता. कामाच्या निमित्ताने त्या दोघांची ओळख झाली. दोघेही शिकलेले, चांगली नोकरी असणारे, बिनधास्त वागणारे त्यामुळे त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.

तरूण-तरूणीची मैत्री निखळ असू शकते, पण या दोघांच्या मैत्रीला वासनेचा रंग आला. ते एकमेकाच्या प्रेमात गुरङ्गटून गेले. दोघे फोनवर तासन्तास गप्पा मारत होते. संधी मिळेल तेंव्हा भेटत होते. या भल्या मोठ्या शहरात दोन तहानलेल्या जीवांना कामतृष्णा भागवण्यासाठी ङ्गार काही करण्याची गरज पडली नाही. पहाता-पहाता बॅक मॅनेजर महिला सबइंजिनिअरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तो मात्र तिच्याबरोबर प्रेमाचे चाळे करून मजा मारत होता, लग्न मात्र दुसर्‍या तरूणीशी केले. तिकडे तिचेही लग्न झाले होते. लग्नानंतर जीवनाचे सोबती आयुष्यात आले. तो संसारात रमला. तिला मात्र नवर्‍याबरोबरच प्रियकरही असावा असे वाटू लागले. ती तयार आहे, म्हणल्यावर तोही तयार झाला. आता ते दोघे घरात जोडीदाराबरोबर सोबत करत होते आणि बाहेर अनैतिक संबंधही ठेवत होते. नंतर मात्र त्याला दोन बायका झेपेनात. दोघींकडे लक्ष देणे त्याच्या हाताबाहेर गेले. तसा तो बायकोलाच वेळ देऊ लागला. प्रेमिकेला टाळू लागला.

ती मात्र त्याने आपल्याशी प्रेम संबंध ठेवावा म्हणून त्याच्या पाठीमागे तगादा लावत होती. सुरूवातीला काही दिवस असेच गेले. त्याने तिची समजूत काढली. आता माझे लग्न झाले आहे, त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही. आपण हे संबंध आता इथेच संपवून टाकू असे तो सांगू लागला, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. अखेर तिला कंटाळून त्याने तिला ब्लॉक केले. तिच्याबरोबरचे सगळे संपर्क बंद करून टाकले. संबंध तोडून टाकले. ती संतापली. इतके दिवस माझ्याबरोबर खेळून आता मला हा कसा काय सोडून जाऊ शकतो या विचाराने ती पेटून उठली.

वासनेने पेटलेली बाई जास्त धोकादायक बनते, तिच्याबाबतीतही तेच झाले. आपण काय करत आहोत याचे तिला भान उरले नव्हते. त्याला अद्दल घडवायची हे तिने मनोमन ठरवले. जो माझा नाही झाला, तर दुसरीचाही होऊ देणार नाही असा विचार करून ती त्याला संपवण्याच्या मार्गाला लागली. कसेही करून त्याचा काटा काढायचा असे तिने ठरवले. ती शिक्षित होती, तिचा संपर्क भरपूर होता, त्यातच ही दुखावली गेली होती, संतापाने पिसाट झाली होती. तिने एक भाडोत्री मारेकरी शोधला. हा सुपारी घेऊन खून करणारा तरूण ओरिसा राज्यातील होता. केमिस्ट्रीमध्ये बीएससी केलेला हा तरूण पैशासाठी खून करायला तयार झाला. मग काय, ती तयारच होती. तिने प्रियकराला मारण्यासाठी या किलरला एक लाख रूपयाची सुपारी दिली. इतकेच नाही तर त्यासाठी लागणारी पिस्तूल आणि बुलेट तीच मारेकर्‍याला देणार होती. आजपर्यंत तिच्या मिठीत असलेला प्रियकर आता थेट मृत्यूच्या मिठीत जाणार होता.

 तिचे हे सगळे उद्योग चोरी-छुपे चालले असले तरी त्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. ओरिसातील भाडोत्री मारेकरी मुंबईत येणार आहे याचा माग लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. तो मुंबईत कोणाला मारण्यासाठी येणार असेल या विचाराने पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. दादर रेल्वे स्टेशन येथे तो येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या ठिकाणी सापळा रचण्यात आला. पोलीस बॅक मॅनेजर महिला आणि कॉन्ट्रॅक्ट किलर या दोघांच्या पाळतीवर होते. जिथे ती त्याला हत्या करण्यासाठी बंदूक आणि पाच गोळ्या देणार होती. तिथेच पोलीस पोहोचले आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतले.

माटुंगा पोलिसांनी केलेल्या या कारवाईने तिच्या प्रियकराचा जीव वाचला. तसेच तिच्याकडे चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून ती आणि मारेकरी या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव इंदलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गुरव, पोलीस नाईक पाल, पवार, मुंडे, मोरे, पोलीस शिपाई जरड, शेलार आणि महिला पोलीस शिपाई परब आणि मोसमकर या पथकाकडून करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत. यामध्ये अनेक धागे आहेत. मुळात हे प्रेमप्रकरण कधी सुरू झाले, त्यांनी लग्न का केले नाही, लग्नानंतर ती त्याच्यावर दबाव का टाकत होती, तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, ती मारेकर्‍यापर्यत कशी पोहचली, तिच्याकडे पिस्तूल आणि बुलेट कशा आल्या यासह अनेक प्रश्‍न आहेत. ज्याचा तपास पोलीस करतील, पण उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरूणाईकडून जबाबदारीची अपेक्षा समाज करत असतो. हे शहाणे लोक समाजाला काहीतरी विधायक मार्ग दाखवतील अशी अपेक्षा केली जाते. ही मंडळी जेंव्हा वासनेच्या आहारी जातात तेंव्हा समाज अचंबित होते. त्यातही एक विवाहित महिला आपल्या विवाहित प्रियकराला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करते. तो संबंध ठेवण्यास नकार देतो, म्हणून त्याचा जीव घ्यायला तयार होते हे तर समाजमनाला धक्का देणारेच आहे. वासनेने पछाडलेली नार अत्यंत घातकी बनते असे सांगितले जाते, पण ती किती अविचारी, क्रूर बनू शकते हे या घटनेतून दिसले आहे. आज ती तुरूंगाची हवा खात आहे. तिच्या माथ्यावर गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. याचा परिणाम तिच्या संसारावर होणार आहे, तर तिच्या प्रियकराचा जीव वाचला असला तरी या प्रकरणाने त्याच्या संसारातही वादळ निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही.

शिरीष वानखेडे

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!