पोलीस टाइम्स
Uncategorized आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

सागरने लुबाडले ८० हजार, मारली मजा. त्याच्या हातून हकनाक ठार झाली पूजा.

माणसाला पैशाची भूक असते. तशी वासनेची भूक असते. काही लोक या दोन्हीची सांगड घालतात आणि वासना भागवतांना पैसाही कमवतात, पण हा मेळ साधता आला नाही तर मात्र मोठी ङ्गसगत होते. पैसाही जातो आणि बदनामीही होते. नाशिकमध्ये एका विवाहितेचे रिक्षाचालकाशी सूत जमले. प्रेमाखातर तिने त्याला ८० हजार रूपये दिले. तो तिला भरपूर पैसे देण्याचे अमिष दाखवून भोगत होता, पण उसने घेतलेले पैसेही परत देत नव्हता. त्यातून त्या दोघात वादाची ठिणगी पडली. या वादातून जे घडले ते मन सुन्न करणारे आहे. सुखी संसार सोडून, हातातले पैसे देऊनही मृत्यू नशिबी यावा यासारखे दुर्दैव काय?

०००

नाशिकच्या म्हसरूळ भागातील मोरे मळ्यात विनोद आखाडे हा तरूण परिवारासह रहातो. तो, त्याची पत्नी पूजा आणि लहान मुलगा असा हा परिवार आहे. अलिकडे चांगल्या घरांनाही वासनेची किड लागू लागली आहे. अनैतिक संबंधाने अनेक संसार पोखरले जात आहेत. बदलत्या जीवनशैलीने कितीतरी मनात वासनेचा विखार पेरण्यास सुरूवात केली आहे. याचे परिणाम गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. पूजा विवाहित होती. रितीरिवाजाप्रमाणे तिचा विवाह झाला होता. सुखात संसार चालला होता. त्यांच्या संसारवेलीवर एक ङ्गुलही उमलले होते. मुलाच्या चिमुकल्या विश्‍वात ती रमली होती, पण तिला परपुरूषाबद्दल ओढ वाटायला लागली. तो पुरूष होता आदेश उर्फ सागर दिलीप भास्कर. सागर हा मोरे मळा परिसरातच रहात होता. तो रिक्षाचालक होता. एका रिक्षा मालकाकडे तो काम करत होता. पूजा बाहेर जातांना सागरच्या रिक्षातून जात-येत असे. यातून त्या दोघांची ओळख झाली. दोघेही तरूण असल्याने बोलाचाली वाढल्या. हळूहळू जवळीक वाढली. मैत्री म्हणता-म्हणता प्रेम जमले. त्या दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. घर-संसाराचा विचार न करता ती एका रिक्षाचालकाच्या नादी लागली. त्याच्याबरोबर केवळ शरीरसुखच घेत होती असे नाही तर ती त्याला सगळी मदत करत होती. दोघे जणू ‘दो जिस्म एक जान’ झाले होते. तिला एक प्रियकर मिळाल्याचा आनंद झाला, तर त्याला एक तरणीबांड बाई भोगायला मिळाली होती. कोणत्याही जबाबदारीशिवाय त्याला ङ्गुकटात शरीरसुख मिळत होते, त्यामुळे तो खुशीत होता. इतकेच नाही तर ती त्याला अडचणीत आर्थिक मदतही करत होती, त्यामुळे तर सागर जास्तच आनंदी होता. तिच्याशी मनसोक्त समागम करायचा आणि तिच्याकडून पैसे घेऊन ऐष करायची असे त्याचे सुरू होते.

काही महिन्यापूर्वी त्याने पूजाकडून एक-दोन नाहीतर तब्बल ८० हजार रूपये उसने घेतले. हे पैसे गुंतवतो आणि तुला भरपूर पैसे मिळवून देतो असे आमिष त्याने तिला दाखवले. ती त्याच्या आमिषाला भुलली आणि जवळचे पैसे त्याला देऊन बसली. तिने पैसे दिल्याचे कोणालाच माहित नव्हते. तिचे अनैतिक संबंध जसे लपून होते, तसेच त्याला दिलेले पैसेही कोणाला माहित नव्हते. तो आपला प्रियकर आहे, तो ङ्गसवणार नाही. आपले पैसे आपल्याला परत देईल असा तिचा विश्‍वास होता, पण तिने चोरून पैसे दिलेत हे माहित असल्याने ते बुडवाचेच असा विचार सागरच्या मनात होता. आपण पैसे बुडवले तर ती कोणाकडे तक्रारही करू शकत नाही हेही त्याला माहित होते, त्यामुळे तो तिला केवळ भूलथापा देऊन भोगत होता आणि ङ्गसवत होता. दरम्यान कोरोना महामारी आली. सगळे व्यवहार बंद झाले. सागरचा व्यवसायही ठप्प झाला. रिक्षाच ङ्गिरेना मग पैसे येणार कोठून? त्याची ही अडचण पूजाला माहित होती, त्यामुळे ती कधी-कधी त्याला थोडे पैसे देत असे. पण लॉकडाऊन संपले, व्यवहार सुरू झाले. आता तो पुन्हा रिक्षा ङ्गिरवू लागला होता. विस्कटलेली घडी पुन्हा बसली होती. मग मात्र त्याने उसने घेतलेले ८० हजार रूपये परत करावेत असे ती म्हणू लागली. ती पैसे मागू लागली की तो तिला आश्‍वासन देऊन गप्प करायचा. तीही त्याच्यावर विश्‍वास ठेऊन गप्प बसायची, पण हे किती दिवस चालणार होते? तो आपले पैसे बुडवण्याच्या तयारीत आहे असा संशय तिला येऊ लागला. तसा तिने जास्तच तगादा लावायला सुरूवात केली.

माझे ८० हजार रूपये मला परत दे असे ती वारंवार म्हणू लागली. भेटल्यानंतर तिला पहिला हाच प्रश्‍न असायचा. ङ्गोनवरून बोलतांनाही ती ८० हजार रूपयांबद्दलच विचारायची. तिच्या या तगाद्याने तो चांगलाच वैतागला. किती सांगितले तरी ती काही पिच्छा सोडत नाही हे लक्षात आल्याने तो तिच्यावर चिडला. तिच्यापासून पिच्छा सोडवायचा असेल तर तिचा आवाजच कायमचा बंद केला पाहिजे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. तिने त्याच्यावर विश्‍वास ठेवला होता, आता तोच तिचा घात करायला तयार झाला होता. त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. ती मेली की आपल्याला ८० हजार रूपये द्यावे लागणार नाहीत असे त्याला वाटत होते, त्यासाठी त्याने तिला मारण्याचाच कट रचला.

मंगळवार दि. १९ जानेवारी २०२१ रोजी पूजाने सागरकडे पैशांची मागणी केली. ‘आजच्या आज मला पैसे हवेत, तू काय पण कर पण मला पैसे दे’ असा तगादा तिने त्याच्यामागे लावला. आजचे तिचे वागणे व बोलणे वेगळेच होते. ते त्याच्या जिव्हारी लागले. ‘आज तू मला कोणत्याही परिस्थितीत भेट, मला पैसे परत हवे आहेत’ असे ती म्हणाली. ती भेटायला बोलावते ते सुखासाठी नाही तर पैसे परत मागण्यासाठी या विचारानेच तो तिच्यावर चिडला. आज तिला अद्दल घडवायचीच या विचाराने त्याने भेटायला बोलावले. मी तुझे पैसे तुला परत देतो, रात्री भेटायला ये असे तो म्हणाला. त्याने एक धारदार चाकू सोबत घेतला आणि रिक्षाने तिच्या घराकडे गेला. त्याने तिच्या घराजवळ रिक्षा थांबवली, तेंव्हा दारात ती आपल्या चार वर्षाच्या मुलासह उभी होती. त्याने तिला जवळ बोलावले, ‘चल तुला पैसे देतो’ असे सांगितले. त्याच्यावर तिचा विश्‍वास होता. तिने मुलाला घरात सोडले आणि ती त्याच्या रिक्षात बसून निघाली. तो तिला घेऊन मखमलाबाद रोडकडे निघाला.

पंचवटी भागातील म्हसरूळ शिवारातील पेठ रोड परिसरातील पवार मळ्यानजीक ते थांबले. ते दोघेही रिक्षात बसून बोलत होते. पूजाने पैशाचाच विषय काढला, तेंव्हा ‘आता माझ्यावर काही नाही, पैसे आले की तुला देतो’ असे त्याने सांगितले. तशी ती चिडली. ‘पैसे देतो म्हणून बोलावलंस आणि आता नाही म्हणतोस, हे चालणार नाही. माझे पैसे परत दे नाहीतर तुला मी सोडणार नाही’ असे ती बडबडू लागली. तो जोराजोरात भांडू लागली. दोघांचाही आवाज चांगलाच वाढला. बाजूला सुरू असलेल्या बांधकामावरील वॉचमनने या भांडणाचा आवाज ऐकला. रिक्षात कोणीतरी जोडपे भांडत आहे हे लक्षात आल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, कारण निर्जन परिसरात अनेक प्रेमी युगूल येत असतात. त्यांच्यात वाद होत असतात. थोड्या वेळाने त्यांचा वाद मिटतो आणि ते निघून जातात हे सर्वांनाच माहित होते. तिकडे रिक्षात मात्र पूजा आणि सागरचे पैशावरून भांडण जुंपले होते. ती त्याला काहीही बोलत होती, शिव्या देत होती. तसा त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने खिशातील चाकू काढला आणि एका क्षणात तिच्या मानेवर वार केला. या हल्लयाने ती घाबरली, पण त्याने तिला ओरडण्याचीही संधी दिली नाही. त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. ती आक्रोश करत असली तरी त्याला तिची दया आली नाही. तिचा आवाज बंद झाल्यावरच तो थांबला. ती रिक्षात निपचित पडली होती. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला. तिचा मृतदेह रिक्षातून बाहेर काढला आणि नाल्यालगत ङ्गेकून दिला, त्यानंतर तो तिथून तो पसार झाला.

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची खबर म्हसरूळ पोलीस ठाण्याला मिळाली आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रूग्णालयात रवाना केला. मृतदेहाची ओळख पटवणे आधी आवश्यक असल्याने पोलिसांनी शहरातील एखाद्या पोलीस ठाण्याला कोणी महिला बेपत्ता झाली असल्याबाबत तक्रार आलेली आहे का याची माहिती घ्यायला सुरूवात केली. त्यामध्ये मोरे मळ्यात रहाणार्‍या विनोद आखाडे याने त्या रात्री पंचवटी पोलीस ठाण्यात त्याची पत्नी पूजा विनोद आखाडे ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिली आहे. त्या महिलेचे वर्णन मिळालेल्या मृतदेहाशी मिळते-जुळते आहे ही माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी विनोद आखाडे याच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. त्याला मृतदेह दाखवण्यात आल्यानंतर तो त्याच्या बेपत्ता झालेल्या पत्नीचाच असल्याचे स्पष्ट झाले. आता पोलिसांनी पती विनोद आखाडे याच्याकडे वेगवेगळ्या तर्‍हेने चौकशी करून माहिती घेतली. अनैतिक संबंधावरून वा आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाला असावा अशी शक्यता वाटत होती.

पूजाचे रिक्षाचालक सागरशी अनैतिक संबंध होते. घटनेआधी ती सागरबरोबर गेल्याचे तिच्या मुलाने सांगितले. तसेच तपास करत असतांना घटनास्थळापासून जवळच बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील वॉचमनने सांगितले की एका काळ्या रंगाच्या रिक्षात एक संशयित व महिला जोरजोरात भांडण करत होते. थोड्या वेळाने ती रिक्षा जोरात तेथून निघून गेली. एक-एक धागा जुळत होता. संशयातून पोलिसांनी सागरचे घर गाठले तर तो घरातून गायब होता. मग मात्र पोलिसांचा संशय बळावला. तो मणियार नावाच्या मालकाची रिक्षा चालवायचा. त्यांच्याकडे जावून माहिती घेण्यात आली, पण सागर कोठे याचा थांगपत्ता लागत नव्हता. मोबाईलच्या लोकेशनवरून तो कडोदा, जि. सुरत-गुजरात येथे असल्याचे कळल्यावर पोलीस पथक तेथे पोहोचले, मात्र पोलिसांना गुंगारा देत तो परत नाशिकला आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली. पूजा ही गर्भवती होती असेही तपासात निष्पन्न झाले असून पैशासाठी सागरने तिचा खून केल्याचे कबुल केले. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, शिवाजी अहीरे, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मयुर पवार, शेवरे, रेहरे, चव्हाण, गुंबाडे व राठोड आदी करत आहेत.

– नागेश मोरे

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!