पोलीस टाइम्स
अहमदनगर आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र हेडलाइन

सासू सुरेखाने लावली फुस, बायको नूतन येईना सासरी! सागरने संपवून दोघींना, गळ्याला लावली फासाची दोरी!

अहमदनगर

विवाह म्हणजे दोन मनांचे, दोन घराण्यांचे मिलन. दोन्ही घरे चांगली असतील तर दोन जीवांचे-मनांचे संसार सुखात होतात, पण अनेकांना याची जाणीव नसते, विशेषत: मुलीच्या पालकांना. लग्नाआधी कधी मुलीचे लग्न होईल म्हणून आटापिटा करणारे पालक लग्नानंतर मात्र तिला सासरी नांदवायला तयार नसतात. तिने लग्न करावे, पण माहेरीच रहावे अशी त्यांची इच्छा असते, पण जावई मात्र नको असतो. मुलीला एकटीला माहेरी ठेऊन घ्यायची तर लग्न कशाला करतात? हा मोठा प्रश्‍न आहे. त्यातच कायदा महिलांच्या बाजूने असल्याने नवर्‍याला, सासू-सासर्‍यांना विनाकारण तुरूंगाची हवा खायला पाठवणार्‍या सूनाही वाढल्या आहेत, कारण त्यांना पालकांची विशेषत: आईची फुस जास्त असते. मुलीच्या आईमुळे अनेक संसार मोडल्याचा निष्कर्ष अभ्यास समितीने काढला आहे, त्यामुळे लग्नानंतर सुखाऐवजी दु:ख, निराशा वाट्याला आलेल्या पुरूषाला जगण्यापेक्षा मरण चांगले वाटू लागते. दुर्दैवाने पुरूषाच्या बाजूने पुरूषही उभे रहात नाहीत. हतबल झालेला पुरूष नको असलेला विचार करतो. अहमदनगरमध्ये अगतिक झालेल्या पुरूषाने बायको आणि सासू दोघींचीही निर्घृण हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केली. मन सुन्न करणार्‍या या घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment