पोलीस टाइम्स
अकोला आवश्य-वाचा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

संशय-शिवीगाळ वाढतच गेला वाद! अतुल-अभिजीतकडून शाहरूख बाद!

अकोला

गुन्हेगारीच्या वाटेवर चालणार्‍यांना माणूसकीची, माया-ममतेची जाण नसते. एखाद्याचा जीव घ्यायलाही ते मागे-पुढे पहात नाही. त्यांच्या दोस्तीतही कधी शत्रुत्व येईल आणि ते एकमेकाच्या जीवावर उठतील याचाही भरंवसा देता येत नाही. अकोला जिल्ह्यात याचाच नमुना दाखवणारी घटना घडली. एकाच भागात रहाणार्‍या तरूणांची ओळख असणे, मैत्री असणे स्वाभाविक असते, नंतर मात्र त्यांच्यात कटूता आली तर त्याची परिणाम जीवघेणे ठरतात. त्या दोघांचीही चांगली ओळख होती, पण एकाला पोलिसांनी पिस्टल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. ही खबर पोलिसांना कोणी दिली याचा विचार करतांना वैमनस्य असणार्‍या तरूणाचा त्याला संशय आला. हा संशय इतका बळावला की त्याने त्याचा जीवच घेतला.

Leave a Comment