पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या हेडलाइन

गतीमंद निखिलची राजकुमारला येई कीव! हतबल बापानेच घेतला लेकाचा जीव!

बेळगावी-खानापूर

जन्मजात मतीमंद असणार्‍या व्यक्ती विक्षिप्त वागत असतात पण त्याचे पालक मात्र त्यांना समजून घेत असतात. त्याच्यावर औषधोपचार करतात, त्याची देखभाल करतात, त्याची काळजी घेतात. मूल लहान आहे तोवर त्याला मायेने सांभाळणे शक्य होते, पण ते मूल मोठे होते, जवान होते, तेंव्हा मात्र त्याला सांभाळणे त्याच्या पालकांना शक्य होत नाही. एक तर त्या मुलाला काही समजत नसते, त्याचे वागणे जास्तच विक्षिप्त झालेले असते आणि त्याचे संगोपन करणारे आई-बाप वृध्द झालेले असतात, थकलेेले असतात. आपल्या पोटच्या मुलाचे होणारे हाल, गतीमंदपणामुळे त्याची होणारी टिंगलटवाळी, अपमान त्या पालकांच्या काळजाचे पाणी-पाणी करत असतो. आपल्या माघारी आपल्या मुलाचे काय होणार? त्याची काळजी कोण घेणार? या विचाराने माता-पिता अस्वस्थ झालेले असतात.

बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बोरगल येथे रहाणार्‍या राजकुमार शंकर मगदूम या बापालासुद्धा आपल्या गतीमंद मुलाचे आपल्या पश्‍चात कसे होणार याची चिंता लागून राहिली होती.  या चिंतेतून त्याने आपल्या मुलाचा खून केला आणि म्हातारपणी आपले पुढील आयुष्य तुरूंगात घालवण्याची वेळ त्याच्यावर आली.

Leave a Comment