पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर रत्नागिरी हेडलाइन

अंकिता आली अभिषेकच्या प्रेमाला भुलून! त्यानेच दिले तिला भाईंदर खाडीत ढकलून!

मुंबई-रत्नागिरी

000

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणार्‍या एका वाडीत रहाणारी अंकिता शिवगण कॉलेजच्या शिक्षणासाठी राजापूर येथे नेहमी येत असे. तिची ओळख तिच्यापेक्षा सिनीयर असलेल्या अभिषेक सरफरे याच्याबरोबर झाली. तोही एका खेडेगावातील तरूण होता. कालांतराने ते दोघे प्रेमात पडले. 2016 पासून अंकिता व अभिषेक या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होतं. अंकिताची परिस्थिती गरिबीची असल्याने ती मुंबई येथे  मलबार हिल येथील फ्लॅटमध्ये आपल्या चुलत भावाकडे राहू लागली, तर अभिषेक हा बोरीवली येथील एका बिल्डिंग साईडवर गार्ड म्हणून काम करत होता. आता अंकिता ही अभिषेककडे लग्नासाठी तगादा लावू लागली होती. आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे तो त्यासाठी उत्सुक नव्हता. यामुळे त्या दोघात लग्नावरून सतत वाद होत होते. जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या विरोधात पोलिसात जाऊन तक्रार दाखल करीन अशी तिने अभिषेकला धमकी दिल्यामुळे अभिषेकला अंकिताचा राग आला. यातून त्याने अंकिताचा काटा काढण्याचा बेत आखला.

अभिषेकने दि. 31 जुलै रोजी अंकिताला त्याने बोलावून घेतले. दोघे एकमेकांना भेटल्यावर तो तिला बोरीवली लोकल गाडीने बोरीवली रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला.तेथून बस स्टँडवर घेऊन गेला. त्यानंतर तो तिला भाईंदर रेल्वे स्टेशन याठिकाणी घेवून गेला. त्याठिकाणी त्याने भाईंदर खाडी दाखवण्याच्या बहाण्याने तिला रेल्वे स्थानकापासून रूळांवरून चालत घेवून गेला. तिथे तिच्याशी गोड बोलत गप्पा मारत अभिषेक खाडी पुलावरून घेवून जात असतांना बेसावध अंकिता त्याने अचानक पुलावरून खाडीमध्ये ढकलून दिले. ती खाडीत पडताच जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागली, परंतु आजूबाजूला कोणीच नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. शेवटी काही वेळातच पाण्यात बुडून अंकिताचा मृत्यू झाला. आपले काम फत्ते झाल्यावर अभिषेक घरी निघून गेला. त्यानंतर आपली चुलत बहीण अचानक गायब झाल्याचे समजताच तिच्या भावाने तिची मिसींगची तक्रार दाखल केली. एक हुषार मुलगी अचानक बेपत्ता का होते? याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदत घेतली. तिच्या मोबाईलच्या कॉलचा सीडीआर काढले असता शेवटचा कॉल हा अभिषेक विठ्ठल सरफरे (वय 22) याचा होता. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताच त्याने आपला गुन्हा कबुल केला.

या घटनेची माहिती मिळताच मलबार पोलिसांनी संशयित आरोपी याला अटक केली.

या घटनेचा सविस्तर वृत्तांत पोलीस टाइम्सच्या अंकात वाचावयास मिळेल.

वेळोवेळी घडणार्‍या ताज्या गुन्हेकथा वाचण्यासाठी आपला अंक तुम्ही नजिकच्या स्टॉलवर बुक करा. वेबसाईटवर अंक वाचावयास हवा असेल तर तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा. (फोन नं.0231-2531696)

Leave a Comment