पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र हेडलाइन

‘बायकोशी का बोलतोस’ म्हणत भास्करने घाले वाद! चिडलेल्या युवराजने दगडाने ठेचून केले त्याला बाद!

कोल्हापूर

युवराज पोटा-पाण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. मुळचा कुडूत्रीचा असणारा युवराज कामानिमित्त कोल्हापूर शहरात आला. त्याच्या शेजारी असणार्‍या भास्करशी त्याची मैत्री झाली. भास्कर पन्नाशीचा तर युवराज पंचविशीचा, दोघांच्या वयात दुप्पट अंतर असूनही त्यांची मैत्री झाली. याचे दुसरे कारण म्हणजे भास्करच्या बायकोचे माहेर कुडूत्री होते. युवराज हा माहेरचा माणूस म्हणून ती त्याच्याशी आपुलकीने वागत होती. हीच आपुलकी तिचा पती भास्करच्या मनात संशयाचे बीज पेरणारी ठरली. युवराजचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असतील, या संशयाने तो इतका पछाडला की तो उठता-बसता संशयाने युवराजशी वाद घालू लागला. या त्रासाला युवराजही वैतागला होता, विनाकारण वाद घालणार्‍या भास्करबद्दल त्याच्या मनात चीड निर्माण झाली. त्याने रागाच्या भरात भास्करला दगडाने ठेचून ठार केले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पोलीस टाइम्सच्या अंकात वाचा…

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment