पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नांदेड मराठवाडा महाराष्ट्र हेडलाइन

मुलगी नको होती की संशयाने पछाडला एकनाथ! वादाचा शेवट झाला भाग्यश्री-सरस्वतीच्या खुनात!

नांदेड

माणसाच्रा डोक्रात एकदा संशराचे भूत शिरले की, त्राला काहीच कळत नसते. काय करावे? काय करू नरे? या विचाराने सैरभैर झालेला माणूस चुकीचेच पाऊल उचलतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणार्‍यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातून सुखाचे संसार मातीत मिसळत असून अनेकांचे बळी जात आहेत. नांदेडमध्ये तर सैन्यदलात जवान असणार्‍या एकनाथने गर्भवती पत्नी आणि तीन वर्षीय मुलीचा निर्घृण खून केला. दुसर्‍यांदा गर्भवती असणार्‍या पत्नीने लिंगनिदान तपासणी करण्यास नकार दिला, तसेच माहेरहून 4 लाख रूपये आणले नाहीत या कारणातून त्याने हे कृत्य केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला, तर तिच्या चारित्र्याच्या संशयातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती उघड होऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र जन्माच्या सोबतीणीला आणि पोटच्या लेकीला ठार मारणार्‍या या निर्दयी माणसाबद्दल समाजातून चीड व्यक्त होत आहे.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment