बुलढाणा
संशयाची किड मनाला लागली की मन आणि मेंदू सडून जातो. सदसद्विवेकबुध्दी संपून जाते. मग मानव फक्त अविचारी जनावर उरतो. त्याला कशाचेच भान नसते. त्यातच संशय वाढण्यास पूरक घटना घडल्या तर बोलायचीच सोय उरत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील त्रिशरणची पहिली बायको दोन मुलांना टाकून पळून गेली, त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. दुसर्या बायकोपासूनही त्याला एक मुलगी झाली. दुसरी बायको आता तीन मुलांना सांभाळू लागली. संसाराचा गाडा ओढू लागली, पण त्रिशरणला तिच्या चारित्र्याचा संशय येऊ लागला. हा संशय इतका वाढला की त्याने शेजारच्या एका तरूणाचा घराच्या दारातच खून केला. केवळ संशयातून एका तरूणाचा खून करून त्या घरा-दाराला दु:खाच्या दरीत ढकलणारा त्रिशरण तुरूंगात गेला, तर त्याची पत्नी आणि तीन मुले उघड्यावर पडली. अविचाराने परिणाम किती भयानक होतात हे दाखवणारी ही घटना आहे.
नवनवीन गुन्हे विश्वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696 वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)