पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

दहा वर्षापूर्वीच्या मारहाणीचा राग गजाननच्या मनात! साथीदाराच्या मदतीने केशवला मारून टाकले रानात!

बुलढाणा

नातेसंबंधात काही वाद-विवाद किंवा तंटे होतात. काही वेळा हाणामारीही होते, पण नंतर हे वाद मिटतात आणि नातेवाईक एक होतात, पण नात्यात पडलेला तिढा सुटतोच असे नाही. आपला वाद, आपल्याला झालेली मारहाण, अपमान कोणी विसरतो म्हणाले तरी विसरतोच असे नाही. परिणामी पूर्ववैमनस्याची तेढ नात्यातील कटूता वाढवत नेते. ही कटूता काही वेळा एखादा गुन्हा घडण्यास कारणीभूत ठरते. बुलढाणा जिल्ह्यात याचाच नमुना दाखवणारी घटना घडली. दहा-बारा वर्षापूर्वीच्या वादाची आठवण करून देणार्‍या, अपमानीत करणार्‍या नातेवाईकांचा त्रिकुटाने खून केला. मृतदेह अनोळखी ठिकाणी टाकून त्यांनी पळ काढला होता, कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता, पण पोलिसांनी पेट्रोल पंपावरील कामगाराने सांगितलेल्या माहितीचा धागा पकडत या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास केला.

Leave a Comment