बुलढाणा
क्षमा, शांती, संयम हे शब्द आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. आयुष्याच्या वाटेवर चालत असतांना प्रत्येकास वाद-विवाद, संघर्षास सामोरे जावे लागते. वाद विवादाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. काही गुन्हे क्षमा करण्यायोग्य नसले तरी संयमाने कायद्यात रहाणे म्हणजेच फायद्यात रहाणे योग्य असते, म्हणून समजदार व्यक्ती क्षमा, शांती, संयमाचा उपयोग करत योग्य मार्ग काढतात आणि संघर्षाला फुल स्टॉप देतात. काही लोक मात्र वाद-विवादात फसत ठिणगीचे रूपांतर आगडोंबात करतात. त्या आगीत आयुष्याची राखरांगोळी करतात. अशाच प्रकारे विनयभंगाच्या तक्रारीवरून दोन कुटुंबात सुरू झालेला वाद, एका 25 वर्षीय युवकाचा बळी गेल्यावरच थांबला. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे घडलेली दुर्दैवी घटना.