पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ

वासनांध सदानंदाच्या चेहर्‍यावर नखाचा ओरखडा! त्यामुळेच लागला बालिकेवरील अत्याचाराचा छडा!

अंढेरा/ बुलढाणा

लग्नसमारंभासाठी आलेली सहा वर्षीय मुलगी झाली बेपत्ता!

दिनांक 12 मे शुक्रवार रोजी चिखली तालुक्यातील प्रसिद्ध तपोवन देवी संस्थान रोहडा येथे तांदुळवाडी येथील लग्नाची घाई सुरू होती. मंदिर परिसरात पाहुण्यांची रेलचेल होती. तांदुळवाडीच्या लग्नासाठी तामसी ता. बाळापूर जि. अकोला येथील 6 वर्षीय अनामिका (काल्पनिक नाव) तिच्या आईसोबत आली होती.  लग्नमंडपात नातेवाईकांसोबत आई बोलत असतांना अनामिका आईचे बोट सोडून इकडे- तिकडे खेळू लागली. काही वेळाने पहाते तर अनामिका आपल्याजवळ नसल्याचे लक्षात येताच आई तिला शोधू लागली.  दुपारी 4 पर्यंत अनामिकाचा कुठेही पत्ता नसल्याने घटनेविषयी पोलिसांना कळवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अप. क्र. 130/2023 कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह

दुपारी 3 च्या दरम्यान पोलिसांची एक टीम तपोवन देवी मंदिर परिसरातील प्रत्येक भाग बारकाईने तपासत होती. मंदिराच्या मागच्या बाजूला 500 मीटर अंतरावर पोलिसांना एक दगडांची पाळ रचलेली दिसली. पाळ संशयास्पद असल्याने त्यातील काही दगड काढताच पोलिसांना धक्काच बसला, कारण त्या दगडाच्या रचलेल्या पाळीत गळ्याभोवती रूमाल गुंडाळलेल्या अवस्थेत निरागस अनामिकाचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेहाचे निरीक्षण केले असता, तिच्या गळ्यावर आणि चेहर्‍यावर संशयास्पद खुणा आढळून येत होत्या. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी बुलढाणा येथे हलवला. अंढेरा पोलीस स्टेशनला भा.दं.वि. 302, 363, 201 नुसार खून करून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बालिकेवर अत्याचार करून खून

मृतक अनामिकाचे पोस्टमार्टम करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतक बलिकेवर अत्याचार करून तिचा गळा आवळून ठार करण्यात आल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर या घटनेत बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाची (पोस्को) कलमेसुद्धा समाविष्ट करण्यात आली.

तपासासाठी पथके रवाना

पोलिसांची चार पथके तपासकामी लागली, पोलिसांनी मृतक अनामिकाचे नातेवाईक, लग्नातील वर्‍हाडी, आजूबाजूची गावे येथे कसून चौकशी केली. तपोवन  मंदिर परिसरात असलेले सर्व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले, मात्र सी.सी.टी.व्ही.चे रेकॉर्डिंग होत नसल्याने पोलिसांच्या पदरी निराशाच आली. संशयावरून सदानंद भगवान रोडगे (वय 24) याला केली अटक. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या गजाआड आहे.

या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, सायबर सेलचे सानप, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, मनोज वासाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे, सहाय्यक फौजदार गणेश देठे, पोलीस नायक भारत पोफळे, पोलीस नाईक गोरख राठोड, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी केला.

घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी वर्गणीदार व्हा अथवा नजिकच्या स्टॉलव जावून पेपर खरेदी करा!

Leave a Comment