पोलीस टाइम्स
Uncategorized आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

शिक्षित असूनही त्रिकुटाने केला अविचार! क्षुल्लक वादातून रितेशला केले त्यांनी ठार!

बुलढाणा

तरूण पिढी सद्या हिंसक वळणावर असून, काही कारण नसतांना किंवा अत्यंत क्षुल्लक कारणावरून खुनासारख्या गंभीर घटना समाजात घडत आहेत. मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या या पिढीची जणू सहनशक्तीच क्षीण झाली आहे. रक्तरंजित चित्रपट, सहन न होणारा अपमान, बदल्याची भावना, वाढत्या शीघ्रकोपास कारणीभूत ठरत आहे. अशाच प्रकारे जुन्या वादातून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना नुकतीच जगप्रसिद्ध लोणार शहरात घडली.

लोणार शहरातील मापारी गल्लीत रितेश सुनिल मापारी हा महाविद्यालयीन तरूणाची हत्या नुकतीच घडली असून त्याच्या खून प्रकरणी शुभम उर्फ विशाल भारस्कर रा. गारटेकी ता. मंठा जि. जालना, शुभम नारायण मापारी लोणार, उदय विनोद सातपुते मातरखेड  ता. मेहकर या तिघांवर अप. नं. 200/23 कलम 302, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

Leave a Comment