पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा चंद्रपूर महाराष्ट्र विदर्भ

एकतर्फी प्रेमाने बनला सैतान, तिला नाही कळले! नीच सिध्दांतच्या क्रूरतेने तिचे आयुष्यच जळले!

चंद्रपुर

तरूण वय हे भविष्य घडवणारे असते. या वयातील निर्णय जीवनावर मोठा परिणाम करत असतात. शिक्षण घ्यावे, कौशल्य शिकावे, नोकरी करावी आणि भविष्य घडवावे असे हे वय, पण या वयात बहुतांशी तरूण मारामार्‍या, गुंडगिरी, प्रेमप्रकरणे यात गुंतून जातात. त्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडत जातात. गुन्हेगारीचा शिक्का माथी बसण्याची शक्यता असतेच आणि आयुष्याची वाताहत ठरलेली असते. काही नीच लोक तर स्वत:बरोबर इतरांच्या आयुष्यालाही मुठमाती देतात. तरूणपणात एकतर्फी प्रेमाने अनेक मुलींची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही एका तरूणाचे एक शाळकरी मुलीवर प्रेम जडले, पण तिने त्याला धुडकावून लावले, तेंव्हा त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोणताही गुन्हा नसतांना ती आता मृत्यूशी झुंज देत आहे, तिच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे तो तुरूंगात गेला असून त्याचे पालकही संकटात सापडले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतील तालुक्यात बेलगाव या गावातील 28 वर्षाच्या सिद्धांत भेले नावाच्या नराधमाने हे कृत्य केेले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदर संशयिताविरूद्ध  अपराध क्रमांक 140/2023 भा.दं.वि. 307 नुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला दि.15 जून 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे हे करत आहेत.

Leave a Comment