पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा चंद्रपूर महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

विशीच्या धीरज करू पहातो वहिनीवर अत्याचार! याचा विचारला जाब म्हणून चुलतीला केले ठार!

चंद्रपूर

लैंगिकता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी त्याचा अतिरेक म्हणजे एक विकृतीच असते. अलिकडे तर माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटाने कोवळ्या वयातच अश्‍लिलतेचे दर्शन मुलांना मिळू लागले आहे. याचा परिणाम अत्यंत घातक झाला असून समाजस्वास्थ धोक्यात आले आहे. वासनेची विषवल्ली मनात रूजू लागल्याने नातेसंबंधांचाही विसर पडू लागला आहे. नात्यातील महिलांकडेही विकृत कामुकतेने पहाणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशीलाही न पोहचलेले नवतरूण वासनेच्या आहारी जाऊन आयुष्याची वाताहत करून घेतांना दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एका 20 वर्षीय तरूणाने आपल्या चुलतीचा खून केला, कारण त्याने त्याच्या वहिनीचा विनयभंग केला होता, त्याची वाच्यता करेल या भीतीने त्याने चुलतीला ठार मारले. अवघ्या 20 वर्षाच्या तरूणाने भावजयीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला, चुलतीला ठार मारले हे समाजाला प्रचंड धक्का देणारे आहे.

Leave a Comment