बुलढाणा
तो अट्टल बदमाश होता. चोर, खुनी होता. त्याने चार खून केले होते. कोरोनानंतर तो ओळख लपवून एका शेतात गडी म्हणून कामाला राहिला, पण अंगातील खोड जात नव्हती. तो शेजारच्या रानात जात असे, तेंव्हा त्या रानाची मालकीण असणारी वृध्दा त्याला हटकत होती. आमच्या शेतात यायचे नाही असे बजावून तिने त्याला फैलावर घेतले होते. या रागातून त्याने तिचा जीवच घेतला. तिच्या अंगावरचे दागिने लुटले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला, पण तोवर तिचा मुलगा आला आणि या खुनाला वाचा फुटली. सविस्तर वृत्तांत वाचा रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये…