पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र हेडलाइन

कष्टाळू राजूच्या मृत्यूला नव्हते कोणते कारण! किरकोळ वादातून अज्जूने त्याला दिले मरण!

नाशिक

माणूस परिस्थितीने खचत जातो, हळूहळू माणसातील माणुसकी संपून जाते. जाणीवाच बोथट होतात. कशाचेच काही सोयरसुतक उरत नाही. एखाद्या जनावरापेक्षाही नीच जीवन काही माणसे जगू लागतात, तिथे कोणाबद्दल दया-माया असण्याचा विषयच नसतो. केवळ स्वत:चा लाभ इतकाच विचार असतो, त्यामुळे अगदी किरकोळ कारणातून एखाद्याचा जीव घ्यायलाही काही लोक मागे-पुढे पहात नाहीत. या अविचारी लोकांच्या संख्येत गरीबी व अज्ञानामुळे जास्तच भर पडते. नाशिक जिल्ह्यातील एका शेतात दोन मजूर कामासाठी आले. रोजंदारीवर काम करणार्‍या या मजूरांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून एकाने दुसर्‍याचा खून केला आणि तुरूंगात गेला. दोन तरूणांच्या आयुष्याची किरकोळ कारणातून वाताहत झाली.

Leave a Comment