पुणे
एखादी महिला चांगुलपणाने बोलत असेल, गप्पा मारत असेल तर तिच्याबद्दल वाईट विचार करण्याची विकृती आंबटशौकीनांमध्ये असते. ते तिला बाहेरख्याली समजून भोगण्याची स्वप्ने पाहू लागतात. तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागतात, पण हे चुकीचे आहे हे त्यांच्या लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. मुंबईत अत्यंत गरीब असणारे भंगार गोळा करून पोट भरणारे जोडपे होते. सुरज आगवान आणि त्याची पत्नी हे दोघेही भंगार गोळा करून पोट भरत असत. मुळचे हे दाम्पत्य उत्तरप्रदेशातील, पण गेल्या काही वर्षापासून पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर रहात होते.
दिवसभर भंगार गोळा करून झाल्यावर सुरज हा आपल्यासारख्याच इतर भंगार गोळा करणार्या लोकांबरोबर दारू पित असे. त्याठिकाणी एक तीस-पस्तीस वर्षाचा तरूणही येत असे. त्याच्याबरोबर सुरजची ओळख झाली. त्याने त्याची ओळख आपल्या बायकोबरोबरही करून दिली. ते जोडपे त्याच्याशी आपुलकीने वागू लागले. त्याचा चुकीचा अर्थ त्याने काढला. थेट त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. आपल्या पत्नीच्या अब्रूवरच हात घालणार्या त्या तरूणाचा इतका राग सुरजला आला की त्याने त्याचा खून केला. तो कोण कुठला याचा काही थांगपत्ता लागला नाही, पण त्याने परस्त्रीवर वाईट नजर ठेवल्याने जीव गमावला. त्याचा जीव घेणारा गजाआड झाला. जिच्या अब्रूसाठी त्याने खून केला, ती त्याची पत्नी मात्र उघड्यावर पडली आहे. सविस्तर वृत्तांत रविवार दि. 30 जुलै 2023च्या अंक नं. 16 मध्ये वाचा….