पोलीस टाइम्स
Uncategorized

नाव सज्जन, कामाने पोलीस अधिकारी! वृत्तीने मात्र गुंड, लाचखोर, बलात्कारी!

अहमदनगर

सज्जन कसला मुळचा तो दुर्जनच होता. सुमारे दीड वर्षापूर्वी सज्जन किसन नार्‍हेडा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून राहरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याचा पूर्वेतिहास तसा काळाच होता, परंतु राहुरीसारख्या ठिकाणी नव्याने हजर होवून ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ या स्टाईलने जसे काय आपण पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहोत या रूबाबात तो वागत होता. त्याच्याकडे देण्यात आलेल्या प्रत्येक केसमध्ये देवाण-घेवाणीची बदबू येत होती. कोणाही बरोबर बोलतांना तो उर्मटपणे धंद्याची बात करत होता. सगळे दिवस आपल्या बापाचे नसतात, या न्यायाने कधी ना कधी याचा कार्यक्रम होणार असे जाणकारांचे मत होते. ज्या आऊटपोस्टला त्याला ड्युटी दिली होती. त्या हद्दीतील महिलेच्या केसमध्ये तिच्यावर सज्जन नार्‍हेडाने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडले. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा दूरक्षेत्र हद्दीतील एका छोट्या गावातील 30 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्‍हेडा याच्याविरूद्ध बुधवार दि. 19 जुलै 2023 रोजी गुन्हा रजि. नं. 789/2023 भा.दं.वि. 376 ़(2) (अ), 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.

Leave a Comment