पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र हेडलाइन

राजूचा करून खून, त्याच्या बायकोला काढतो रगडून! पाप झाले उघड, कारण गणेश होता तिच्याजवळ पडून!

छत्रपती संभाजीनगर

रेणुकाचा पहिला संसार मोडला, पती तिला सोडून पदरात एक मुलगी देऊन गेला. एका मुलीची आई असल्याने तिच्या दुसर्‍या लग्नात अडचण येणे स्वाभाविक होते, पण राजूसारखा समंजस पुरूष तिच्या आयुष्यात आले. नातेवाईकांच्या मध्यस्थीने रेणुका-राजूचा विवाह झाला. सावत्र मुलीवर राजू आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करत होता, तर या दाम्पत्याला दोन मुले झाली. रेणुका तीन मुलांची आई झाली होती. तिला राजूसारखा समजूतदार नवरा मिळाला होता, पण तिच्या मनात वासनेची आग भडकली आणि शेजारच्या तरण्याबांड गणेशला ती प्रतिसाद देऊ लागला. स्त्री सुखासाठी आसूसलेला गणेश संधी मिळताच तिच्यावर तुटून पडला. दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले याची माहिती मिळाल्यानंतर राजूने त्या दोघांना भेटण्यास मनाई केली. आपल्या सुखात राजूचा अडसर येतो या विचाराने गणेश आणि रेणुकाने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

Leave a Comment