पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या महाराष्ट्र हेडलाइन

प्रियांकाला लग्नानंतर, हवा आधीचा प्रियकर! तिच्यासाठी श्रीधर, संपवतो तिचा पती शंकर!

गोकाक-मुडलगी

खर्‍या प्रेमात कसोटी असते, अनंत अडचणी असतात यात तावून-सुलाखून निघाले की प्रेम बहरते. त्याग हे प्रेमाचे दुसरे रूप आहे. आपला प्रेमी किंवा प्रेमिका सुखी असावेत असे म्हणतात ते खरे पे्रेमिक, परंतु काही जोडपी प्रेमाच्या नावाखाली कामुकतेत वहात जातांना दिसत आहेत. ती जर मला मिळाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही असा सूर काही विकृत तरूणांमध्ये दिसतो. दोघांचे प्रेम आहे, पण मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले तर प्रेम असफल होते. हे प्रेम विसरून जाण्याशिवाय पर्याय नसतो, पण एखादा विकृत तरूण असा असतो की त्याला प्रेमिका संसारात सुखात रमलेली आवडत नाही. तो इतक्या नीच स्तरावर जातो की तिच्या संसाराची वाताहत करायलाही मागे-पुढे पहात नाही. याचेच उदाहरण असणारी घटना गोकाक जवळील मुडलगी येथील वडेरहट्टी येथे घडली. प्रियकराने प्रेेयसीच्या नवर्‍यालाच संपवून टाकले. नाहक त्या तरूणाचा जीव घेतला, प्रेयसीचा संसार मोडून तिला विधवा बनवले आणि स्वत: तुरूंगात गेला. या अविचारी निर्घृण घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment