पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नंदूरबार महाराष्ट्र हेडलाइन

धुमसत्या जमिनीच्या वादात भिडले दोन परिवार! एकाने केला गोळीबार त्यात बाप-लेक झाले ठार!

नंदूरबार

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमाभागावर आदिवासी बहुल समाज रहातो. या कष्टकरी आदिवासी बांधवांना शासनाद्वारे उपजिवीकेचे साधन म्हणून शासकीय वनजमिनीतील पट्टे शेती करण्यासाठी दिले गेले आहेत. ज्या-ज्या शेतकर्‍यांना हे शेतजमिनीचे वाटप केले आहे, त्या शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून काही जमीनधारकांचे सतत वाद होत असतात. ज्यावेळी सरकारने हे वाटप केले, तेंव्हा या जमिनी ताब्यात येईपर्यंत या लोकांनी एकमेकांशी जुळवून घेतले, पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले. तसा त्यांचा कौटुंबीक पसारा वाढू लागला, तेंव्हा मात्र त्यांच्यामध्ये मालकी हक्कावरून वाद होवू लागले. अशाच प्रकारची गंभीर घटना गुरूवार दि. 27 जुलै 2023 रोजी घडली. त्याचा हा वृत्तांत.

Leave a Comment