पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र

संशयाने घातले थैमान, मच्छिंद्रचे सुटले भान! अपघाताचा करी बनाव, घेऊन पत्नीचे प्राण!

नाशिक

संशयाचा किडा संसाराला पोखरून खिळखिळे करून टाकतो. पती-पत्नीच्या नात्यातील विश्‍वासाला तर संशयाची वाळवी झपाट्याने पोखरून टाकते. आपल्या सुख-दु:खात साथ देणार्‍या पत्नीवर अनेकजण विनाकारण संशय घेऊ लागतात. काही वेळा तर मनाचे हे खेळ खरेच वाटू लागतात. हा संशय इतका पराकोटीला जातो की आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन ज्या पत्नीला दिले, तिचेच आयुष्य संपवण्यासाठी काही संशयी पुरूष तयार होतात. पत्नीचा खून करून स्वत: तुरूंगात जातात, पोरा-बाळांना मात्र अनाथ बनवतात. याचाच नमुना दाखवणारी घटना नाशिक येथे घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा रागाच्या भरात खून केला. हा खून पचवण्यासाठी त्याची धडपड सुरू असतांना भाच्याने त्याला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली. त्यानंतर अपघाताचा बनाव केला, पण पोलिसांनी सत्य शोधून काढलेच. पत्नीचे आयुष्य संपवून तो भाच्यासह तुरूंगात गेला. दोन मुलांना पोरके करून गेला.

Leave a Comment