पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर हेडलाइन

वारंवार पळून जात असे मुलगी, आईला वाटे ताप! कसे सांगणार? शरीराचे लचके तोडतो सावत्र बाप!

नवी मुंबई:

ती उत्तरप्रदेशातून पतीबरोबर मुंबईत आली आणि तिला छानछोकीत रहाण्याची सवय लागली. यातून ती लेडीज बारमध्ये काम करू लागली. पहाता-पहाता देहविक्री करून पैसा कमाऊ लागली. पैशाबरोबर तिला एच.आय.व्ही. मिळाला. तिने औषधोपचार सुरू केले, पण पतीपासून आजार लपवून ठेवला. त्यामुळे त्याचे एडसग्रस्त होऊन निधन झाले. दोन लहान मुली पदरात असल्याने तिला काम करत रहाण्याशिवाय पर्याय नव्हता. एका मुलीला होस्टेलला, एकीला माहेरी ठेऊन ती व्यवसाय करत राहिली. दरम्यान एक पुरूष तिच्या आयुष्यात आला. तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली, तसेच तिच्यासाठी ग्राहकही शोधून देऊ लागला. त्या संसारात तिला दोन मुले झाली. आता तिला आपल्या मुलीला होस्टेलमधून घरी आणावे असे वाटले. त्याला दुसर्‍या पतीने होकार दिला. आई-बापाची माया मिळणार या आनंदात ती मुलगी घरी आली, पण त्या 12 वर्षीय मुलीवर सावत्र बापाचीच विकृत नजर पडली. पुढे सुरू झाल्या त्या अजाण मुलीच्या नरकयातना.

Leave a Comment