पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा कथा कोकण विभाग नंदूरबार नाशिक पश्चिम महाराष्ट् पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई शहर राशी-भविष्य विज्ञान कथा / गुढ कथा सिनेमा हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार, दि. 23 जुलै 2023 अंक  15

काय वाचाल आजच्या अंकात!

मानवतेच्या भावनेने जैन मुनींनी दिला मदतीचा हात! पण कृतघ्न नारायण-हसनने केला त्यांचा क्रूर घात!

चिक्कोडी

‘अहिंसा परमो धर्म’ असे जैन धर्मियात मानले जाते. देशात तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकात जैन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. लहान-मोठ्या शहरात, गावात त्यांची बस्ती आहे, आश्रम आहेत. कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडीपासून नागराळकडे जाणार्‍रा रस्त्रावर नंदीपर्वत आश्रम (मठ) आहे. सुमारे 15 वर्षापासून जैन समाजाचे आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज यांनी टप्पाटप्प्याने अनुयायांच्या सहकार्याने आश्रमाची स्थापना केली. कालांतराने या आश्रमाची व्याप्ती वाढून येथे जैन धर्मातील श्रावक-श्राविका भक्तीभावाने येथे येवून पुजा-अर्चा करू लागले. या पिठाची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी झाल्याने येथे भाविकांचा ओघही वाढला.

दारू घेण्याच्या बहाण्याने जोडले दारूवालीशी संबंध!  तिचा नवरा विनयने केला रोहिदासचा आवाज बंद!

नंदुरबार

विनयला मोबाईल फोनची रिंग ऐकू आली, त्याने इकडे-तिकडे पाहिले, तेंव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या बायकोच्या फोनची रिंग वाजत आहे. बायको तर बाहेर गेली आहे. तिला कोणाचा फोन आला आहे पाहू तरी म्हणत त्याने फोन हातात घेतला, तर रोहिदासचा फोन आलेला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने कॉल रिसीव्ह केला आणि गुपचुप कानाला लावला. पलिकडून रोहिदास प्रेमाच्या गप्पा मारू लागला, तसा विनयचा पारा चढला. त्याने काहीच न बोलता फोन बंद केला. त्याची बायको वत्सला आणि रोहिदास यांच्या संबंधाबद्दल लोक बोलत होते, ते खरे असल्याची खात्री त्याला पटली होती. आता काय करावे? आपल्या बायकोशी शरीरसंबंध ठेवणार्‍या रोहिदासला धडा तर शिकवलाच पाहिजे या विचाराने तो कट रचू लागला.

अनैतिक संबंधावरून सासर्‍याला सूनेने फटकारले! त्या रागात दिनकरने मेघाला गळा आवळून मारले!

पुणे

अनैतिक संंबंध विनाशाचे मूळ कारण ठरतात, तरीही काही लोक या मार्गावर जातातच. तारूण्यात वासनेच्या आहारी जाऊन अनैतिक संबंध ठेवले जात असले तरी वृध्दत्वाकडे जातांना मात्र नीतिनियम पाळले पाहिजेत. जवानीत ज्या चुका झाल्या त्या उतारवयात सुधारल्या पाहिजेत. मुले-मुली मोठी झाली, सून-जावई आले, नातवंडे झाली की वासनेवर आवर घालावा लागतो. हे नाही जमले तर मात्र घरात कलह निर्माण होण्यास वेळ लागत नाही. पुण्यात एकाचे अनैतिक संबंध त्याच्या सूनेच्या कानावर गेले. बापासमान सासरा परस्त्रीशी संबंध ठेवतो, त्यामुळे गावात बदनामी होते हे तिला खटकले. यावरून तिने त्याला चांगलेच फटकारले. याचा त्याला राग आला. आपली सून आपल्या शरीरसंबंधात अडसर होते, या रागातून त्याने असे पाऊल उचलले. सूनेचा जीव घेतला, मुलाचा संसार उद्ध्वस्त केला, तीन नातींना पोरके बनवले. या वासनांधाला काय म्हणावे? हा प्रश्‍नच आहे.

अंधश्रध्दाळू निकेशला नव्हती वास्तवाची जाणीव! तोडगा सांगणार्‍या जन्याबाईचा त्याने घेतला जीव!

नाशिक

जीवनात अनेक अडीअडचणी येत असतात. त्यावर उपाय शोधत काही लोक देवदेवस्की करणार्‍यांच्या नादी लागतात, तरीही काही फरक पडत नाही. तेंव्हा मात्र देवदेवस्की करणार्‍याबद्दल मत वाईट होते. त्यातून तंटा निर्माण होऊ शकतो, पण नाशिक येथे अत्यंत निंदनीय घटना घडली. एका तरूणाला निराशेने घेरले होते. त्याचे चांगले होण्यासाठी गावातीलच एक बाई त्याला अंगारा, तोडगा देत होती, पण झाले भलतेच. तिच्या अंगार्‍याने फरक पडत नसल्याने त्याने तिचा जीव घेतला. त्याचा हा वृत्तांत…

इतका नराधम की अत्याचार करतो लेकीवर! या लिंगपिसाटाला बाप म्हणावा की जनावर!

नवी मुंबई

अलीकडे नीती-अनीती, विधी-निषेध, नाते-गोते बासनात गुंडाळून ठेवले आहेत. सगळीकडेच संस्कृतीचा र्‍हास होतांना दिसत आहे. लोकं स्वार्थासाठी आणि वासना शमवण्यासाठी कोणतेही दुष्कर्म करण्यास सहजासहजी तयार होत आहेत. इंटरनेटच्या विळख्यात अडकलेल्या वासनांधांना तर आई-बहीणही कळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. इतर नात्यांची तर केंव्हाच राख झाली आहे. नवी मुंबईत नुकताच एक गुन्हा उघडकीस आला, त्यामध्ये तर जन्मदात्या बापानेच आपल्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. सातत्याने लेकीचे लैंगिक शोषण करून त्या नराधमाने तिला गर्भवती बनवले, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्या अल्पवयीन मुलीची अत्याचारातून सुटका झाली तर तिचा नीच बाप गजाआड गेला.

Leave a Comment