पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

‘कंटाळा आलाय नवर्‍याचा, मारून टाक त्याला’! शितलच्या सांगण्यावरून अतुलने संपवले सुनिलला!

पुणे- यवत

 स्त्री असो वा पुरूष, सर्वांनीच जगतांना भान जपले पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे, पण अलिकडे काही जणांनी ताळतंत्रच सोडला आहे. कामवासनेने पछाडलेल्या स्त्री-पुरूषांना संसाराचा, जोडीदाराचा विसर पडतो. काही महिला तर प्रियकराकडून सुख मिळावे यासाठी पतीपासून वेगळ्या होतात. ते शक्य नसते तेंव्हा पतीचा काटा काढायलाही मागे-पुढे पहात नाहीत. पुण्यात शितल आणि सुनिल हे जोडपे एका कंपनीत काम करत होते. याच कंपनीत अतुल काम करत असे. तोही विवाहित होता, पण त्याने शितलला जाळ्यात ओढले. तिनेही पतीचा विश्‍वासघात करून अतुलशी अनैतिक संबंध जोडले. हे संबंध सुनिलला कळले, तेंव्हा भांडणाला तोंड फुटले. तसेच शितल आणि अतुल यांच्या भेटी-गाठीत खंड पडला. एकमेकाचा विरह सहन न झाल्यामुळे ते दोघे सुनिलच्या जीवावर उठले. तिने तर अतुलला सांगितले की, ‘मला नवर्‍याला कंटाळा आला आहे, त्याला संपवून टाक म्हणजे आपण बिनधास्तपणे मजा करू शकतो’ तिने ऐकून अतुलने सुनिलला ठार मारले. पत्नीच्या वासनेच्या आगीत सुनिलचा बळी गेला, तर त्याला मारणार्‍या पत्नी शितल आणि तिचा प्रियकर अतुल यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे.

Leave a Comment