कोल्हापूर
सोशल मीडीयाने तरूणाईला पुरते वेडे करून सोडले आहे. इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले तरूण-तरूणी कोणताही अविचार सहजपणे करू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर कलंक लागल्याशिवाय रहात नाही. सोशल मीडीयावर मैत्री म्हणजे सेक्सकडे वाटचाल असा समज अनेक तरूणांनी करून घेतला आहे. एखादी मुलगी फ्रेंड झाली, चॅट करू लागली तर तिच्याबद्दल गैर विचार करणार्यांची संख्या वाढत आहे. तिला त्रास देणार्याची विकृत प्रवृत्ती वाढत आहे, त्यामुळे काही मुली छळ आणि अत्याचाराच्या बळी ठरत आहेत, तर काही तरूणी मात्र त्रास देणार्याला अद्दलही घडवतात. हे करत असतांना कायदेशीर मार्गानेच केले पाहिजे, गैरमार्गाचा वापर केल्यास त्या तरूणीलाही गजाआड होण्याची वेळ येते. कोल्हापूरात घडलेल्या एका घटनेने हेच दाखवून दिले आहे.