सोलापूर
कष्ट करणार्याला कामाचा दाम दिलाच पाहिजे, पण बहुतेकदा काम करून घेतले जाते आणि पैसे देण्यास मात्र टाळाटाळ केली जाते. काही वेळा तर काम करूनही हक्काची मजूरी भीक मागितल्याप्रमाणे मागण्याची वेळ गोरगरीबांवर येते. काही जणांना पैशाची इतकी मस्ती असते की काम तर करून घेतात, पण कामाचे पैसे देतांना मात्र उपकार केल्यासारखे वागतात. त्यांच्याबद्दल चीड येऊनही गरीब माणूस काही बोलू शकत नाही. परिस्थितीमुळे विनंती करण्यापलिकडे त्याच्या हातात काही नसते. त्याची विनंतीही काही लोकांना नको वाटते. मजूरी मागितली म्हणून मजूरांना मारहाणही केली जाते. सोलापूर जिल्ह्यात तर कामाचे पैसे मागितले म्हणून गरीब कामगाराला तिघांनी मरेपर्यंत मारले. त्या निर्घृण घटनेचा हा वृत्तांत.