पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग ठाणे महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

भिक मागणार्‍या मुलीला, बाळ्याने ओढले जाळ्यात !गर्भवती करून सोडले, सापडला पोलिसांच्या जाळ्यात!

डोंबिवली :

तिने वयाची 12 वर्षही पूर्ण केली नव्हती. त्याआधीच तिच्या आई-वडीलांचे निधन झाले. मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती सासरी गेली होती, त्यामुळे ती आणि तिचा भाऊ मिळेल तिथे काम करून पोट भरू लागले. भावाला काम मिळत होते, तो कामावर जात होता. तिकडेच कुठेतरी रहात होता, तर ती भिक मागून पोट भरू लागली. ती एकटी असल्याचे पाहून एका 22 वर्षीय रिक्षाचालक तरूणाने तिच्याशी जवळीक केली, तिला लग्नाचे अमिष दाखवून घरी नेले. तिथे त्याने तिच्यावर बळजबरीने वारंवार बलात्कार केले. या अत्याचाराने ती गर्भवती झाली, तसे त्यानेही तिला हाकलून दिले, पण एका आशा सेविकेच्या तत्परतेमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. मन सुन्न करणारे प्रकरण डोंबिवली येथील आहे.

000

मनुष्याच्या आरुष्यामध्ये कधी व केंव्हा कोणता प्रसंग निर्माण होईल हे काही सांगता येत नाही. काही जण हे जन्मतःच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, परंतु या भूतलावर असेही काही जन्माला येतात की, त्याच्या वाट्याला दुःख आणि दुःखच असते. अशाच एका दुर्दैवी मुलीच्या नशिबात दुःख आणि दुःखच आल्यामुळे तिला जगणंही मुश्किल झालं आहे. तिचं नाव सपना, ती आपल्या आई-वडीलांसोबत उल्हासनगर नंबर 5 या ठिकाणी रहात होती. तिचे आई-वडील व तिचा एक मोठा भाऊ व मोठी बहीण असे सर्व जण अगदी मजेत जीवन जगत होते. सपनाला काय हवं व काय नको यासाठी तिचे आई-वडील सतत धडपडत असत. त्याचे आपल्या मुलांवर खूप प्रेम होते. सपनाला तर असे वाटत होते की मी खूप नशिबवान आहे. मला असे आई-वडील मिळाले की, ते माझी खूप काळजी घेतात परंतु तिला काय माहित होते की तिच्या नशिबात परमेश्‍वराने पुढे काय वाढून ठेवले आहे.

हळूहळू दिवसा मागून दिवस जात होते. सपना मोठी होत होती. ती जसजशी मोठी होत होती तसतशा तिच्या गरजाही वाढत होत्या. आता ती बारा वर्षाची झाली होती. तिच्या मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली होती. आता सपना एकटी मुलगी घरात राहिली. त्याच दरम्यान तिच्या आई-वडीलांचे निधन झाल्याने ती पोरकी झाली. आता ती एकटीच घरात रहात होती. ती खूप लहान असल्याने काय करावे आणि काया करू नरे याची तिला समज नव्हती, परंतु पोटाची खळगी तर भरायचीच होती. तिच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. तिला सांभाळणारे, आधार देणारे कोणी नव्हते. ती लहान वयातच भीक मागू लागली आणि भीक मागून जमा झालेल्या पैशातून ती उदरनिर्वाह करू लागली होती. ती उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी असलेल्या चालिया मंदिराबाहेर थांबून भीक मागत असे. त्याठिकाणी रिक्षा चालक असलेला बाळ्रया मागच्या वर्षी तिला भेटला. त्याने तिची विचारपूस केली. तो म्हणाला की, ‘तुझं नाव काय आहे आणि तू कुठे रहाते, तू भीक का मागते?’ तेंव्हा सपना म्हणाली की, ‘माझं नाव सपना असून माझ्या आई-वडीलांचे निधन झाल्याने मी भीक मागून माझा उदरनिर्वाह करते.’ सपना अवघ्या बारा वर्षाची होती, परंतु शरीराने तिची वाढ झाली असल्याने ती बाळ्रयाच्या मनात भरली होती.

तो दररोज तिला येऊन भेटायचा. येतांना तिला वडा-पाव घेऊन यायचा. तिच्याशी गोड-गोड बोलायचा. तो तिला घेऊन रिक्षात बसायचा व बाहेर फेरफटका मारून पुन्हा तिला मंदिराजवळ आणून सोडायचा. दिवसामागून दिवस जात होते. बाळ्याने सपनाशी चांगलीच जवळीक केली. सपनाला बाळ्या खूप चांगला माणूस वाटू लागला होता. तिला वाटत होते की, बाळ्या आपली किती काळजी घेतो. तो खूप चांगला मुलगा आहे, पण 22 वर्षीय बाळया हा सपनाला त्याच्या जाळयात ओढत होता आणि ती हळूहळू त्याच्या जाळ्यात अडकत होती. बाळ्या तसा एकटाच होता, त्याच्या घरात कोणीही नसल्याने तो एकटाच रहात असे. तो भाड्याने रिक्षा घेऊन त्याचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पोटाची भूक तर भागत होती, परंतु शरीराची भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला बाहेरचा शौक परवडणारा नव्हता, त्यामुळेच त्याने सपनाला गोड बोलून आपल्रा जाळ्यात ओढून आपली कामवासना पूर्ण करून घेण्याचा प्लॅन रचला.

एक दिवस बाळ्या सपनाला म्हणाला की, ‘सपना, तू मला खूप आवडते. माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. मला वाटते की तू माझ्यासोबत रहावे. मी तुला सुखात ठेवीन व तुझ्याशी लग्नही करेन’ त्याच्या या भुलथापाला सपना बळी पडली. ती म्हणाली की, ‘ठीक आहे, मी तुझ्यासोबत राहीन.’ तिने होकार दिल्याने बाळ्या खुष झाला. बाळ्याने सपनाला त्याच्या घरी आणले. हळूहळू त्याने तिचा विश्‍वास संपादन केला. तसे पहाता सपना अवघ्या तेरा वर्षाची असल्याने तिला थोडी-फार जाण होती. एके दिवशी त्याने सपनाच्या मनाचा ठाव घेतला. तो तिला म्हणाला की, ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे. काळजी करू नकोस. तू मला खूप आवडते.’ असे बोलून तो तिच्याशी चाळे करू लागला. त्या रात्री त्याने बळजबरीने सपनासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. सपनाला मात्र ते संबंध नको होते, पण बाळ्याने तिच्यासोबत तिच्या मर्जीविरूद्ध शरीरसंबंध ठेवले. ती त्याच्या आधारावरच असल्याने हतबल झाली होती. तिला हा अत्याचार सोसत नव्हता, पण तिच्यासमोर काही पर्यायही दिसत नव्हता. ती त्याचा अत्याचार सोसून गप्प राहिली, तसे त्याचे फावले. तो दररोजच तिच्यासोबत रात्री व वेळ मिळेल तेंव्हा शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला होता.

या अनैतिक शारिरिक संबंधातून त्या महिन्यात सपनाची मासिक पाळी चुकली, परंतु तिला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पुढच्या महिन्यातही तिची पाळी आली नाही आणि मग तिला वाटले की आपण गर्भवती झालो आहोत. तिने बाळ्राला सांगितले की, ‘मला तुझ्यापासून दिवस गेले आहेत. मी पोटुशी आहे. माझी पाळी चुकली आहे.’ हे ऐकून बाळ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. यातून आपली सुटका कशी करून घ्यायची या विवंचनेत तो पडला. त्याने तिला घरातून हाकलून लावले.

उल्हासनगर कॅम्प 5, आंबेडकर नगर या परिसरातच सारिका रघुनाथ ढाले (वर  42) या आशा सेविका परिवारासह रहातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हॉस्पिटलकडून लसीकरण कॅम्प त्याच्या परिसरातील अंगणवाडीमध्रे लावण्यात येत असतो. त्या आशा सेविका म्हणून त्याच्या परिसरात घरोघरी जाऊन लहान मुले व गरोदर स्त्रिया याची पहाणी करून त्याना लसीकरणासाठी लावलेल्या कॅम्पच्या ठिकाणी बोलावत असतात. एके दिवशी आंबेडकर नगर येथील एका घरासमोरून जात असतांना एक अल्पवरीन मुलगी त्याच्या निदर्शनास आली. तिचे पोट मोठे दिसत असल्याने ती गरोदर असावी याची त्याना खात्री पटली होती. त्या पटकन मुलीजवळ पोहोचल्या आणि तिला विचारले की, ‘तुझे नाव काय आहे व तुझे वय किती आहे?’ त्यावर ती मुलगी म्हणाली,‘ माझे नाव सपना आहे.’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘अगं तू गरोदर आहेस ना? मग तू तुझ्या नावाची नोंदणी व तपासणी करण्यासाठी जवळच्या अंगणवाडीमध्ये ये, तिथे कॅम्प भरला आहे.’ पण सपना काहीतरी कारण सांगून ते टाळण्याचा प्रयत्न करत होती, हे सारिका यांच्या लक्षात आले.

पुन्हा एक-दोन महिन्राच्या अंतराने सारिका ढाले आठवणीने सपना रहात असलेल्रा ठिकाणी पोहोचल्या, तेंव्हा सपना त्यांना घरातच दिसली. त्यानी बोलता-बोलता तिचा विश्‍वास संपादन करून तिचे ब्रेन वॉश केले. तिला गरोदरपणाबाबत बरीच माहिती दिली. त्यानी त्यादिवशी अंगणवाडीमध्रे मेडिकल कॅम्प लावला होता. त्या ठिकाणी तिला तपासणीसाठी आणले. तिथे तिची तपासणी करण्यात आली आणि पुढील तपासणीसाठी तिला सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर कॅम्प 3 या ठिकाणी रेऊन सोनोग्राफी करायला सांगितले. जेणेकरून तिच्या गर्भात वाढत असलेले बाळ कसे आहे? त्याची वाढ बरोबर होत आहे किंवा नाही? हे आपल्याला समजेल असे सपनाला त्या कॅम्पमध्रे सांगण्यात आले.

आशा सेविका सारिका ढाले रांनी सपनाला दुसर्‍रा दिवशी सकाळी अकरा वाजता उल्हासनगर मध्रवर्ती रूग्णालयात तपासणीसाठी आणले. त्यावेळेस त्या ठिकाणी कर्तव्रावर असलेल्रा वैद्यकीय अधिकार्‍यानी सपनाला तपासले. तिचे वर त्यानी विचारले असता तिने तिचे वय तेरा वर्ष असल्राचे सांगितले. हे ऐकून वैद्यकीय अधिकार्‍रांनी तात्काळ सारिका याना बाजूला घेऊन सांगितले की, ‘सदर मुलगी अल्पवरीन आहे आणि अल्पवरीन मुलगी गरोदर कशी झाली, तिचे लग्न झाले आहे का? आदी चौकशी करून राबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पाहिजे. आम्ही अशा अल्पवरीन मुलीची नोंदणी करून घेऊ शकत नाही. ही पोलीस केस आहे. तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनमध्रे हिला घेऊन जा.’ असा सल्ला त्यानी सारिका याना दिला.

आता सारिका ढाले विचारात पडल्या की, आता कार करावे? अल्पवरीन मुलगी गरोदर रहाते म्हणजे काय? याचा छडा लागलाच पाहिजे म्हणून त्यानी तिला विश्‍वासात घेतले. तिची विचारपूस केली, तेंव्हा सपनाने रडत-रडत सगळी हकीकत सांगितली. माझे आई-वडील मरण पावले आहेत. मोठ्या बहीणीचे लग्न झाले असून ती तिच्या घरी तिच्या नवर्‍यासोबत रहाते, माझा भाऊ जिथे काम मिळेल त्या ठिकाणी रहात असतो. घरी मी एकटीच रहाते, म्हणून मी चालिया मंदिर, उल्हासनगर या ठिकाणी भीक मागून पोट भरत होते. तेथे बाळ्रया गायकवाड या रिक्षा चालकाशी माझी ओळख झाली. त्यानंतर त्याने लग्न करतो असे सांगून त्याच्या घरी नेले. तिथे तो माझ्यासोबत माझ्या इच्छेविरूद्ध अश्‍लील चाळे करून, बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला होता. त्या महिन्यात मला एकदाच मासिक पाळी आली, त्यानंतर मला माझी मासिक पाळी आल्याचे आठवत नाही. मी बाळ्याला सांगितले की मला तुझ्यापासून दिवस गेले आहेत. मी आई बनणार आहे. हे ऐकताच त्याने शिव्या देत विचारले की, तुला पाळी आली नाही. हे तू मला लवकर का सांगितले नाहीस? मी पाळी रेण्रासाठी तुला गोळ्रा आणून दिल्या असत्या म्हणत त्याने मला घरातून मारहाण करून शिव्या देत हाकलून दिले. त्यानंतर मी रडत-रडत चालिया मंदिर उल्हासनगर नं. 5 या ठिकाणी असलेल्रा माझ्या ओळखीच्रा मनू (मानलेला भाऊ) याच्या घरी आले. माझी आपबिती सांगितली नंतर मी तिथेच राहू लागली. तो माझा मानलेला भाऊ आहे. सर्व प्रकार ऐकताच सारिका यानी सपनासह तात्काळ हिललाईन पोलीस ठाणे गाठले.

हिल लाईन पोलिसांनी सपनाकडून खरी माहिती विचारून घेतली आणि नंतर चौकशीत हा प्रकार अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्रा हद्दीत घडला असल्राने हिल लाईन पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांसह सपना व सारिका याना अंबरनाथ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हा प्रकार गंभीर असल्याने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यानी तात्काळ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख याना बोलावून घेतले व सदर तपास त्याच्याकडे सोपवत तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यानी बाळ्रा उर्फ बबलू लाल गायकवाड याच्या विरोधात सपना वर वर्ष 13 ही अल्पवरीन असल्राचे माहित असतांनाही तिच्या अज्ञानतेचा, तिचे आई-वडील नसल्याचा तसेच एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला प्रेम करतो व आपण लग्न करू अशा भुलथापा देऊन तिचा विश्‍वासघात करून व तिच्याशी मनाविरूद्ध अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने शरीरसंंबध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्राने त्याच्या विरोधात त्यानी आशा सेविका सारिका ढाले याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एका अनाथ मुलीचा गैरफारदा घेतल्याने तात्काळ ज्याच्याविरूद्ध फिर्राद देण्यात आली होती, त्या नराधम बाळ्रा गायकवाड वय अंदाजे 22 वर्ष रहाणार गायकवाड पाडा, अंबरनाथ पूर्व याच्याविरूद्ध अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाणे पूर्व या ठिकाणी गुन्हा रजि. क्र. 44/2022 भा.दं.वि. कलम 376 (2)(एन) बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनिरम 4,5 (एल) (क्रु) प्रमाणे नोंद करण्यात आली. बाळ्याला अंबरनाथमधून अटक केली.

दरम्यान काही दिवसानंतर सपनाने कळवा हॉस्पिटलमध्रे एका मुलीला जन्म दिला, परंतु ती मुलगी जन्मतःच मरण पावल्याचे डॉक्टरांनी सपनाला सांगितले. सध्या बाळ्या हा न्यायालरीन कोठडीत आहे.

या गुन्ह्यासंदर्भात उल्हासनगर विभागाचे डी.सी.पी. प्रशांत मोहिते व ए.सी.पी. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यानी त्याचे सहकारी रायटर दादासाहेब वाघमारे, महिला सहाय्यक पोलीस सब इन्स्पेक्टर सोनवणे, महिला पोलीस शिपाई ढोबळे, महिला पोलीस शिपाई राठोड, महिला पोलीस नाईक भामरे याच्या सहकार्र्याने पूर्ण केला.

Leave a Comment