पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा गोवा हेडलाइन

विरोधात साक्ष दिली म्हणून धमकावले! मेहबूबला अँथोनीच्या हातून मरण आले!

अलिकडच्या दोन-तीन वर्षात गोव्यात खूनखराबा होेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. बाहेरील राज्यातून मजुरीसाठी अनेक जण गोव्यात येवून वास्तव करतात. त्याचे काही ना काही कारणातून वाद-विवाद होतात आणि मग खुनाची घटना घडते असे बर्‍याच वेळेला दिसून आले आहे. त्यातच दोन मित्रातील वाद कधी विकोपाला जातील हे काही सांगता येत नाही. त्यातून त्यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन मैत्री संपवून दुश्मनी निर्माण होते. एकमेकाला संपवण्याची भाषा ते करू लागल्याने खुनाच्या घटना घडायला वेळ लागत नाही. याचा नमुना दाखवणारी घटना नुकतीच घडली. मेहबूबविरोधात एका गुन्ह्याचा खटला सुरू होता, यामध्ये त्याचा मित्र अँथोनी याने मेहबूबविरोधात साक्ष दिली आणि दोघा मित्रात कटूता निर्माण झाली. मेहबूब अँथोनीला अद्दल घडवण्यासाठी टपून बसला होता, तर त्याला प्रतिकार करण्यासाठी अँथोनीही सावध होता. एक दिवस दोघे मित्र भिडले, त्यात अँथोनीच्या हातून मेहबूबचा जीव गेला.

Leave a Comment