पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र हेडलाइन

लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांचा झाला वाद! शब्बीर-सलमाच्या मारहाणीत सद्दाम झाला बाद!

इचलकरंजी

बर्‍याच वेळेला खेळतांना लहान मुलांमध्ये भांडणे होत असतात. त्यावेळी काही मुले एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिव्याही देतात आणि एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांच्या उरावरही बसतात. त्यावेळी मोठ्या माणसांनी त्यांना समजावून सांगणे आवश्यक असते, परंतु असे होतांना कधी दिसून येत नाही. कधी-कधी लहान मुलांची भांडणे ही मोठया माणसाच्या जीवावर उठतात. त्यातून एखाद्याचा जीवही जातो, तर त्याला मारणारे गजाआड होतात. दोन्ही मुलांचे पालक संकटात सापडतात आणि मुलांना पोरके करतात. इचलकरंजीत याचेच उदाहरण ठरणारी घटना घडली. एका मुलाला दुसर्‍याने मारले, तेंव्हा त्याचा जाब विचारण्यासाठी मुलाचा बाप सद्दाम शाळेत गेला. आपल्या मुलाला मारणार्‍यांच्या कानशिलात लगावल्या. त्या मुलाने हे आपल्या आईला म्हणजे सलमाला सांगितले ती चिडली आणि भावाकडे गेली. सलमा आणि शब्बीर या बहीण-भावाने सद्दामला जाब विचारतांना इतकी मारहाण केली की त्यात त्याचा जीव गेला, तर हे बहीण-भाऊ तुरूंगात गेले. लहान मुलांच्या भांडणातून तीन संसार पाण्यात बसले. मुले पोरकी झाली.

Leave a Comment