पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र हेडलाइन

‘समाजकल्याण’साठी शासन देते वंचित मुलांना शिक्षण!‘केअरटेकर’च बनला भक्षक, कोण करेल त्यांचे रक्षण!

जळगाव :

जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील बालगृहात 9 ते 12 वयोगटातील काही मुलींचे तेथील केअर टेकरने लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या वसतीगृहाची महिला अधीक्षक ही केअर टेकरची पत्नी असून तिने पतीच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रकार केला. याशिवाय या बाल वसतीगृहाचा सचिव हा देखील केअर टेकरचे पाप लपवण्यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर हळूहळू या घटनेतील पिडीतांची आणि संशयितांची संख्या वाढली. या घटनेची व्याप्ती बघता क्रमाक्रमाने एकूण तीन गुन्हे एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल झाले. सुरूवातीला पाच अल्पवयीन पिडीत मुलींवरील अत्याचार उघडकीस आला, त्यानंतर एका मुलावरही अत्याचार झाल्याचे उघड झाले. सुरूवातीला तिघांविरूद्ध, नंतर चौघांविरूद्ध त्यानंतर सहा जणांविरूद्ध वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

Leave a Comment