जळगाव
घरात एक वेळ खायला नसले तरी हरकत नाही, मात्र घरात आजारपण नको असे जुने-जाणते लोक म्हणत होते, मात्र निसर्गानेच जन्मजात अथवा बालपणापासून आजारपण अथवा काही व्याधी दिल्यास मनुष्याचा नाईलाज असतो. त्यातल्या त्यात एखाद्या गरीबाच्या घरात देवाने आजारपण दिल्यास कुणाकडे दाद मागावी? आजारपणाला वैतागून अनेक जण आत्महत्याही करतात. सततच्या आजारपणामुळे नातेवाईकही कंटाळून जातात. घरात सतत आजारी रहाणार्या व्यक्तीमुळे घरातील इतर सदस्यांना त्रास होत असतो. आजारी अथवा व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरीक आजारासोबतच मानसिक आजारदेखील हळूहळू बळावत असतो. डॉक्टर आपला इलाज करत असतात, मात्र आजारी व्यक्तीमुळे घरातील-परिवारातील इतरांना होणारा त्रास डॉक्टर दूर करू शकत नाही, त्यामुळे काही वेळा आजारी माणसाच्या दुःखी जगण्यापेक्षा त्याने मेलेले बरे असे वाटून जाते. हा विचार काही वेळा जन्मदात्या बापाला खुनी बनवतो. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.