पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र हेडलाइन

‘बायकोकडे वाईट नजरेने नको पाहू’सांगून थकला! लंपटपणाने आशिष प्रमोदच्या हातून जीवाला मुकला!

जळगाव :

लग्न झाल्यानंतर तरूणींना पतीचे सौभाग्य प्राप्त होत असते, त्यामुळे विवाहीत महिलांना सौभाग्यवती म्हटले जाते. लग्नापूर्वी आई-वडीलांच्या छत्र छायेखाली रहाणार्‍या तरूणीस लग्नानंतर पतीरूपी कायदेशीर कुंपण लाभते. विवाहितेवर तिच्या पतीचा कायदेशीर हक्क असतो, मात्र एखाद्या देखण्या विवाहितेवर काही टवाळखोरांची नजर असते. असे टवाळखोर तरूण विवाहितेची छेड काढतात. त्या टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी कायदा हाती घेणे चुकीचे असते, मात्र काही विवाहीत तरूण संतापाच्या भरात कायदा हाती घेवून कायद्याचा फास आपल्या गळ्यात लावून घेतात. अशीच एक घटना जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी या गावी घडली.

जळगावनजीक धरणगाव तालुक्यातील बांभोरी या गावी प्रमोद भिमराव नन्नवरे हा तरूण रहातो. त्याच्या घराजवळच आशिष प्रकाश शिरसाळे हा तरूणही रहात होता. अवघा 22 -23  वर्ष वयाच्या आशिषची नजर प्रमोदच्या पत्नीवर पडली. तो नेहमी प्रमोदच्या पत्नीची छेडखानी करत असे. आशिषच्या या नेहमीच्या प्रकाराला प्रमोदची पत्नी वैतागली. तिने ही बाब आपला पती प्रमोदच्या कानावर घातली असता त्याने आशिषचा खून केला.

या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Leave a Comment