पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र सामाजिक हेडलाइन

वर्षाच्या प्रेमाची भावांना लागली कुणकुण, तिच्यासह प्रियकराचा केला निर्घृण खून!

जळगाव  :

वर्षा समाधान कोळी जेमतेम वीस वर्षाची तरूणी होती. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ती चोपडा येथील एम.जी. महाविद्यालयात जात होती.

चोपडा येथील एम.जी. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणार्‍या वर्षाचे वडील समाधान कोळी नगरपालिका रूग्णालयात वॉचमनची नोकरी करतात.

विशीच्या अल्लड वयात तिची राकेश संजय राजपूत या बावीस वर्ष वयाच्या तरूणाबरोबर प्रेमप्रकरण होते.

 दि. 12 ऑगस्टचा 2022 चा तो दिवस. त्या रात्री दोघांनी सोबत पळून जाण्याचे नियोजन केले होते. दि. 12 ऑगस्टच्या रात्री आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास राकेशने तिच्या घराजवळ यायचे आणि तिने घराबाहेर येवून त्याच्यासोबत पळून जायचे असे ठरले होते, पण त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. आपली बहीण राकेश राजपूतसमवेत पळून जात असल्याचे लक्षात आल्यावर वर्षाचे दोन भाऊ, तिचा ममावस भाऊ तुषार कोळी, चुलत भाऊ भरत रायसिंग या सर्वांंनी मिळून राकेशचा खून केला. राकेशने जीव सोडल्याचे बघून वर्षा आक्रोश करू लागली. आता वर्षाच्या लहान भावाने खिशातील रूमाल काढून त्याचा फास वर्षाच्या गळ्याभोवती आवळला.

आपण केलेल्या कृत्याचा वर्षाच्या लहान भावाला रात्रभर पश्‍चाताप झाला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. अखेर दि. 13 ऑगस्टच्या सकाळीच त्याने गावठी पिस्टलसह चोपडा शहर पोलीस स्टेशन गाठले. गुन्हा करण्यात सहभागी असलेल्या वर्षाच्या भावानेच फिर्यादी होत आपला गुन्हा कबुल केला.

या गुन्ह्याच्या तपासात चौघांसह पाचवा संशयित आरोपी जय कोळी हादेखील निष्पन्न झाला असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. घटनेच्या वेळी व ठिकाणी जय कोळी हादेखील असल्याचे तपासात आढळून आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले करत आहेत. या गुन्ह्यातील मयत वर्षाचे दोघे लहान भाऊ अल्पवयीन आहेत. बाल सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली असून तुषार कोळी, भरत रायसिंग व जय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

घटनेचा सविस्तर वृत्तांत पोलीस टाइम्सच्या अंकात वाचायला मिळेल. पोलीस टाइम्स सर्व स्टॉल्सवर उपलब्ध!

शिवाय आपणांस वेबसाईटवरच तपशीलवार घटना वाचावयास हवी असेल तर तुम्ही आजच पोलीस टाइम्सच्या कार्यालयाशी संपर्क साधा….

Leave a Comment