पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र हेडलाइन

कारण इतकेच की बघितले निरखून! म्हणून सहा जणांनी केले तिघांचे खून!

जळगाव

शांताराम रात्रीच्यावेळी घरी निघाले होते. वाटेत पानाच्या टपरीजवळ बसलेल्या दिपककडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी आपल्याकडे पाहिले याचा राग दिपकला आला. त्याने त्यांना शिवीगाळ गेली. शांताराम तिथून परतले. त्यांनी भाऊ राकेश, चुलत भाऊ विकास आणि शेजारी रमेश यांना ही हकीकत सांगितले, तेंव्हा विनाकारण शिव्या देणार्‍या दिपकला जाब विचारण्यासाठी ते चौघे गेले. तिकडे दिपक मारामारीसाठी तयारच होता. तो आणि त्याच्या साथीदारांनी या चौघांवर प्राणघातक हल्ला केला. या धुमश्‍चक्रीत चौघातील तिघे ठार झाले. त्यांचा परिवार दुःखाच्या सागरात लोटला गेला. तिघा जणांचा परिवार उघड्यावर पडला. तिघांच्या पत्नी पतीरूपी छत्राला आणि तिघांची मुले बापाच्या छत्रछायेला पारखी झाली. या तिघा जणांचे सहा मारेकरी तरूण गजाआड झाल्यामुळे त्यांचा परिवार कमी-अधिक प्रमाणात शोकाकुल झाला. केवळ क्षुल्लक कारणावरून भुसावळ तालुक्याच्या कंडारी या गावी हा रक्तपात घडून आला.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment