पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर हेडलाइन

दोन मुलांच्या आईशी, संबंध ठेवतो अरहान! तिच्या भावांनी दिला चोप, घेतले त्याचे प्राण!

कल्याण

त्यादिवशी रात्री एक महिला एका मध्यमवयीन पुरूषासोबत कल्याण पश्‍चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यात आली. तिने ठाणे अंमलदारांना सांगितले,‘साहेब माझा दोन नंबरचा पती सायंकाळपासून गायब झाला आहे.’ हे ऐकताच ठाणे अंमलदार बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, ‘तुम्ही अगोदर बसा व शांत व्हा. मला सविस्तर काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. दोन नंबरचा पती म्हणजे काय?.’ त्यावर ती महिला म्हणाली, ‘साहेब, माझ्यासोबत हे माझ्या दुसर्‍या पतीचे वडील अर्थात माझे सासरे आहेत. माझ्या पहिल्या पतीपासूनची दोन मुलांसोबत व दुसर्‍या पतीपासून जुळ्या असलेल्या दोन मुलांसोबत मी रहाते. तिथे माझा दुसरा पती त्याची मुले नेण्यासाठी आला होता, तेेंव्हा आमच्यात वाद झाला. हा वाद माझे भाऊ मिटवत होते, पण वाद मिटला नाही, तेंव्हा माझ्या भावांनी माझ्या पतीला जबर मारहाण केली आणि रिक्षात टाकून कुठेतरी घेऊन गेले.’ ही माहिती चक्रावणारी होतीच, पण त्या तरूणाचे तिच्या भावांनी अपहरण केले हे स्पष्ट करणारी होती. याची गांभिर्याने दखल घेऊन पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. या गुन्ह्याचा एक-एक धागा उलगडत पोलिसांनी छडा लावला.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment