पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर हेडलाइन

कोवळ्या मनात साचतोय वासनेचा विखार! अल्पवयीनांकडूनही बालिकेवर अत्याचार!

कल्याण :

माणूसपणाचे नीतिनियम आता माणूसच संपवून टाकू लागला आहे. संस्कृतीऐवजी विकृतीचे संस्कारच केले जात असल्याने चिमुकली मनेही विखारी बनली आहेत. लहान मुलांमध्येही हिंसकता, कामुकता, गुन्हेगारी वाढत आहे. चिमुकल्या मनात रूजलेल्या विकृतीच्या विषवल्ली समाजासाठी अत्यंत घातक ठरणार आहेत, कारण आता लहान असणारी ही मुले भावी पिढी असून त्यांच्या मनातील विषारी बिजांच्या विषवृक्ष होतील, जे सर्व समाजाला बाधक ठरतील. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. समाजात चिंता वाढवणारी एक घटना कल्याण शहरांमध्ये नुकतीच उघडकीस आली. अवघ्या दोन वर्षीय निरागस बालिकेवर शेजारच्या पंधरा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.

Leave a Comment