पोलीस टाइम्स
Uncategorized

आई-वडील म्हणत काम कर,म्हणून चिडला! सचिनने चिडून वडील कृष्णाला घरातच तोडला!

कोल्हापूर

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणीचा आधार असे मानले जाते. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे व चांगले वागावे अशी सर्वच पालकांची इच्छा असते, पण स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. काही लोकांचा स्वभावाच रागीट, संशयी असतो. ते कोणत्याही कारणातून कोणावरही राग धरतात. एकलकोंडी माणसे तर जास्तच घातक ठरतात. कारण मनातले सांगण्यासाठी, आधार देण्यासाठी त्यांच्याजवळ कोणीच नसते. ही माणसे स्वत:च्या जन्मदात्यांवरही चिडून रहातात. त्यातून घरात तंटा निर्माण होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावात यात्रेच्या दिवशीच मुलाने आई-बापावर खुरप्याने वार केले. यात बापाचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. यात्रेदिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत होती.

Leave a Comment