पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग रत्नागिरी हेडलाइन

सोनाली भांडून जायची माहेरी, अंगाला लावू देत नाही हात!  संशयाने पछाडले संदेशला, केला तिच्यासह मुलाचा घात!

लांजा/रत्नागिरी-

नवरा-बायकोच्या संसारात भांडणाचे खटके अधून-मधून उडत असतात. त्यात काही वावगेही नाही. त्यात एक शांत आणि दुसरा तापट असेल तर हे भांडण फार काळ टिकत नाही. एक जण शांत राहून हे प्रकरण मिटवून मोकळा होतो, पण काही वेळा शांतपणाचा गैरफायदा जोडीदार घेत असेल तर सारे गणितच बिघडत जाते. त्यातही भांडण करून पत्नी माहेरी जात असेल तर संसारात संशय शिरायला वेळ लागत नाही. हा संशय संसाराची वाताहत करून सोडतो. रत्नागिरी जिल्ह्यात शांत संदेशला भांडखोर सोनाली बायको म्हणून मिळाली. तिने त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेत, त्याच्याशी जणू दावाच मांडला. दोन मुले झाली तरी त्यांच्यातील वाद मिटला नाही. ती भांडून माहेरी निघून जायची. तो तिची समजूत काढून घरी घेऊन यायचा, पण ती काही त्याला अंगाला हातही लावू देत नव्हती. एक तर ती सारखी भांडण करते, भांडून माहेरी जाते आणि जवळ येत नाही या सगळ्यातून त्याचा तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला. हा संशय इतका वाढला की त्याने तिचा खून केला. यावेळी जागा झालेल्या मुलालाही त्याने संपवले. संशयातून पत्नी आणि मुलाचा खून करून तो तुरूंगात गेला. आता त्याची आई आणि एक मुलगा मात्र पोरके झाले आहेत.

Leave a Comment