पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा मराठवाडा महाराष्ट्र लातूर हेडलाइन

लेकीचा करतो छळ, म्हणून आईला आली कळ! जावई हनुमंतला संपवण्यासाठी मित्रांना दिले बळ!

लातूर

घरोघरी मातीच्या चुली असे म्हटले जाते. तसेच काहीशी अवस्था ग्रामीण भागात एखादी नाकी-डोळी नीटस तरूणी मनमोकळेपणाने वागू लागली, इतरांशी संवाद साधू लागली की, त्या तरूणीच्या घरच्यांना उगीचच तिच्या चारित्र्याबद्दल शंका यायला लागते. ती विवाहित असेल तर तिच्या पतीला आपल्या पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत की काय? अशी शंका यायला लागते. एकदा का संशय मनात आला की संसाराची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. पती पत्नीला छळू लागतो, तेंव्हा तिचा छळ तिच्या आई-वडीलांना सहन होत नाही. ते जावयाची समजूत काढू पहातात, पण तो ऐकतच नसेल तर मात्र संसार मोडण्यापर्यंत मजल जाते. लातूरमध्ये एक लेकीची जाचातून सुटका करण्यासाठी थेट जावयालाच मारण्याची सुपारी दिली. विशेष म्हणजे जावयाला मारण्याच्या प्लॅनमध्ये सासूसोबत त्याची पत्नीही होती, तर हे काम फत्ते करण्यासाठी सासूचे दोन मित्र हत्यार घेऊन सज्ज झाले. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment