पोलीस टाइम्स
अहमदनगर आवश्य-वाचा इतर बातम्या कथा कोकण विभाग कोल्हापूर चंद्रपूर नाशिक पश्चिम महाराष्ट् पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड राशी-भविष्य विज्ञान कथा / गुढ कथा विदर्भ सांगली सातारा सोलापूर हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार दि. 9 जुलै 2023 अंक 13

काय वाचाल आजच्या अंकात….

कष्टाने मिळवली इज्जत, खोट्या आरोपाने मनाला खंत! संतोष यांनी तेजस्विनी-अर्जुनसह केला जीवनाचा अंत!

कोल्हापूर  – गडहिंग्लज शहरातील गांधीनगरात शिंदे रांचा बंगला आहे. शुक्रवारी (दि. 23) रात्री संतोष हे पत्नी व मुलांसह झोपण्रासाठी दुसर्‍रा मजल्रावरील बेडरूममध्रे गेले. सकाळी वेळेत उठणारे संतोष अजून का उठले नाहीत, हे पहाण्रासाठी त्रांच्रा आईने संतोष रांचा चुलत मेहुणा शुभम राला वरच्रा मजल्रावर पहाण्रासाठी पाठवले. त्राने दार वाजवून त्रांना उठवण्राचा प्ररत्न केला, परंतु आतून कोणताच प्रतिसाद न आल्राने त्याने खिडकीतून वाकून पाहिले असता आतील दृश्र पाहून तो भरभीत झाला. त्राने शेजार्‍रांना बोलावून घेतले. दरवाजा तोडला. बेडरूममध्रे खाली तिघेही रक्ताच्रा थारोळ्रात पडले होते. संतोषच्रा शेजारी रक्ताने माखलेला चाकू, तर त्राच खोलीत कीटकनाशकाची बाटलीही होती. पहिल्रांदा हे कीटकनाशक पिऊन मगच चाकूने गळा कापून घेतल्राचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्रक्त केला. एका उमद्या उद्योजकाने घरात आत्महत्या का केली असेल? हे मोठे कोडे होते. त्यातच पत्नी, मुलांसह मृत्यूला कवटाळल्याचे दृश्य काळजाचे पाणी करणारेच होते. एका हसत्या-खेळत्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी जबाबदार असणार्‍यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दोस्ती निर्मळ मनानं, केली दर्शनानं! राहुलनं घेतला बळी एकतर्फी प्रेमानं!

पुणे – राजगड – पुणे हे विद्येचे माहेरघर. येथे शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मुलं-मुली येत असतात. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे वर्ग, खाजगी क्लासचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे येथे अनेक मुलं-मुली ज्ञानाचे धडे गिरवून परीक्षांचे आव्हान जिंकतातसुध्दा. खेडेगावामध्ये रहाणारी सर्वसामान्य कुटुंबामधील मुलं-मुली सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सक्रियपणे करू लागले आहेत. काही मुलं-मुली हॉस्टेलला राहून, पार्टटाईम जॉब करून परीक्षा देतात. खेडेगावामधील असो वा शहरामधील पालक आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे पाठवतात. त्यांना लागणारे कमी-जास्त पहातात. पैसा-अडका आपली पदरमोड करून पाठवून देतात. का तर मुलं मोठी व्हावी, आपल्या कुटुंबाचे, गावाचे नाव मोठं करावे. येथे मुला-मुलींची मैत्री होते. त्यातही काही गैर नाही. बदलत्या जगात निकोप मैत्रीची असंख्य उदाहरणे आहेत, पण मैत्री करतांना विशेषत: मुलींनी काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे, कारण मित्र म्हणून गोड-गोड बोलणारा, काळजी घेण्याचे नाटक करणारा एखादा नीच तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. याची भयानक उदाहरणे पुण्यात वारंवार घडत आहेत हे दुर्दैव. नुकताच दर्शना पवार या गुणी मुलीचा तिच्या मित्रानेच निर्घृण खून केला. पोलिसांना गुंगारा देणार्‍या राहुल हंडोरेला पोलिसांनी ताब्यात घेतले. केवळ पालकांच्या पसंतीने ती लग्न करणार होती आणि तिचे पालक राहुलबरोबर तिचे लग्न लावून देणार नव्हते. या कारणातून त्याने तिचा निर्घृण खून केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे, पण या प्रकरणात आणखी काही धागे आहेत का? गुन्ह्यात आणखी कोण सामिल आहे का? याचा तपास अद्याप सुरू आहे.

आधी दिनेशच्या बायकोला जाळ्यात ओढले! सुरेशकुमारने त्यालाच मारून खड्डयात गाडले!

मुंबई – तिचा संसार सुखात सुरू होता, पण तिच्या घरी सी.सी.टी.व्ही. बसवणारा तरूण आला. तो तिच्या पतीचा मित्रही होता, पण तो अवघा 26 वर्षाचा तरूण असल्याने तिच्या मनात वेगळाच विचार आला, तर त्याच्या मनातही कामवासनाच होती. दोघांच्या मनात वासनेचे वादळ उठल्याने विनाशाकडे वाटचाल होण्यास वेळ लागला नाही. पतीचा विश्‍वासघात करून ती त्या तरूणाबरोबर शरीरसंबंध ठेऊ लागली. या अनैतिक संबंधाची माहिती तिच्या पतीला झाली, तसे त्याने दोघांनाही धमकावले. आता तिच्याकडून सुख मिळणार नाही या विचाराने कासावीस झालेल्या त्या तरूणाने तिच्या पतीचा घात केला. त्याचा मृतदेह गाडून तो मोकळा झाला, पण पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला ताब्यात घेतले, तेंव्हा आपल्या वासनांधतेमुळे आपल्या पतीचा बळी गेला हे पाहून ती हादरून गेली.

दहशत माजवण्यासाठी दिपक झाला गुन्हेगार! त्रासाला कंटाळले तरूण, केले त्यालाच ठार!

चंद्रपुर – तारूण्याचा जोश संचारला की गुन्हेगारीकडे पावले पडू लागतात. गुंडा गर्दी केली की लोक घाबरतात असे तरूणांना वाटते. त्यातूनच समाजात दहशत निर्माण करण्यासाठी काही तरूण गुन्हेगार बनतात, पण गुन्हेगाराचे मरण कुत्र्यासारखे असते याची जाणीव मात्र त्यांना नसते. एकाही गुन्हेगाराला चांगले मरण आलेले नाही. गुंडाला कोणी तरी एकटे गाठून हालहाल करून मारतात. चंद्रपूर जिल्ह्यातही नुकतेच एका गुंड प्रवृत्तीच्या तरूणाला एका टोळक्याने दांडक्याने मारून ठार केेले.

नितूकुमारीला होत नव्हते मूल-बाळ! पती रोनितराजच बनला तिचा काळ!

अंबरनाथ – मुल व्हावे असे सर्वच दाम्पत्यांना वाटत असते, पण काही जणांना मुल होण्यात अडचण येते, तेंव्हा अनेक उपाय केले जातात. उपास-तापास करण्यापासून वैद्यकीय उपचारापर्यंत अनेक प्रयत्न केले जातात. मुल न होण्यामुळे पै-पाहूणे विनाकारण टोचत रहातात, त्यामुळे त्या दाम्पत्यांचे मानसिक खच्चीकरण होत असते. निराश झालेल्या मनात अनेक विचार येतात. काही वेळा ही जोडपी मरणाला जवळ करतात, तर काही वेळा या दाम्पत्यातच कलह निर्माण होतो. संसार मोडतात. पत्नीला दोष देऊन तिला छळणारेही आहेत. अंबरनाथ येथे तर एकाने मुल होत नाही या कारणाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला निर्दयीपणे ठार मारले.

वाळू तस्करांना रविंद्रने अडवले! टोळीने त्याला मरेपर्यंत तुडवले.

नाशिक – वाळू व इतर गौण खनिजची दादागिरीने चोरी करणार्‍या गुन्हेगारी टोळ्या सर्वत्र निर्माण झाल्या आहेत आणि अशा गुन्हेगारी टोळ्यांनी दहशत निर्माण केली. गौण चोरी करण्यास जो अडथळा आणेल त्याचा बंदोबस्त करायला ही मंडळी घाबरत नाहीत. उलट तलाठी असो की तहसिलदार त्यांच्या अंगावरही गाड्या घालायला ही मुजोर मंडळी घाबरत नाहीत. त्यापध्दतीनेच मालेगाव तालुक्यातील डाबली गावात गौण खनिजाची चोरी करण्यास विरोध करणार्‍या वाळू माफियांनी हल्ला चढवत एकाचा खून करण्याची घटना घडली.

बुडवायचे होते उसने घेतलेले दोन हजार! म्हणून श्रीधरने केला मित्र पांडुरंगवर वार!

सांगली – मैत्रीत एकमेकाला मदतीचा हात देणे हा चांगुलपणा आहे, पण मदत दोन्ही बाजूंकडून असली पाहिजे. एकाने मदत करायची आणि दुसर्‍याने त्याचा गैरफायदा घ्यायचे असे झाल्यास वितूष्ट आल्याशिवाय रहात नाही. त्यातही उसनवारी असेल तर मैत्रीला तडा जाण्याची शक्यता अधिकच असते. उसनवारीतून मित्र शत्रू बनायला वेळ लागत नाही याची अनेक उदाहरणे आहेत. सांगली जिल्ह्यात दोन मित्रांमध्ये केवळ दोन हजार रूपयाच्या उसनवारीने वाद निर्माण झाला. ज्याने अडचणीत पैसे उसने दिले, त्याचाच मित्राने कृतघ्नपणे खून केला.

संतोषचा करून खून, पसार झाले त्रिकुट! पोलिसांनी शोधले, मग शरण आले निमुट!

सोलापूर – अज्ञानी माणसाजवळ मोठे धाडस असते, कारण त्याला परिणामाची जाणीव नसते. त्यातच अलिकडे हिंसक बनत चाललेली तरूण पिढी तर परिणामांचा विचार न करताच कोणतेही गैरकृत्य सहजपणे करू लागली आहे, त्यामुळेच कोवळ्या वयात माथ्यावर गुन्हेगारीचा कलंक घेऊन तुरूंगात जाण्याची वेळ आली आहे. सोलापूरातील 18-19 वर्षाच्या तीन तरूणांनी बसस्थानकात एका गरीब इसमाला गाठले. त्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून जाऊ पहाणार्‍या त्या इसमाला त्या त्रिकुटाने आडबाजूला पुन्हा गाठले. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. आपला आणि त्या इसमाचा काहीच संबंध नसल्याने आपण पोलिसांना सापडणारच नाही असे त्या त्रिकुटाला वाटत होते, पण गुन्हा कधीच लपत नाही याची जाणीव मात्र त्यांना नव्हते, त्यामुळे त्या तिघांच्या हातात बेड्या पडल्या. अजून आयुष्य सुरू होण्याआधीच ते तुरूंगात गेले.

वाढत गेला उबाळेंचा वाद फुटभर जागेतून! दोघे गेले तुरूंगात, सुखदेवचा करून खून!

अहमदनगर – शेजारी त्यात नातेसंबंध असतात, तेंव्हा त्यांच्यात एकोपा असावा असे मानले जाते. पण बहुतेकदा नातेसंबंधात वादच जास्त असतो. अगदीच किरकोळ कारणातून नात्यात तिढा पडतो. रोज तंटे होतात. कोर्टकचेर्‍या सुरू होतात. काही वेळा एखादाचा बळी जातो. याचेच दुर्दैवी उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात घडले. दोन परिवारात किरकोळ वाद होता, त्यातून वृध्द दाम्पत्यावर शेजारच्या दोन तरूणांनी कोयत्याने हल्ला केला. यात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी अंथरूणावर खिळली. त्यांना मारणारे दोन तरूण आता जेलची हवा खात आहेत.

हायवेवर ट्रक थांबवून चालकास लुटले! दीड तासात पोलिसांनी तिघांना पकडले!

बुलढाणा  – गुन्हेगार स्वत:ला खूपच चलाख समजत असतात. आपण सहजगत्या एखादा गुन्हा करू आणि पोलिसांना गुंगारा देऊ असे त्यांना वाटत असते, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. गुन्हा घडल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली, तर गुन्हेगारांची खैर नसते. त्यामुळे कोणताही प्रसंग आल्यानंतर तातडीने पोलिसांची मदत घेण्याची गरज आहे. बुलढाणा येथे हायवेवर चोरट्यांनी ट्रक थांबवून चालकाला लुटले, तेंव्हा घाबरलेल्या चालकाने पोलिसात तक्रार केली आणि अवघ्या दीड तासात चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

दादू-विनोदला आला राग कोणाचे तरी ऐकून! दुसर्‍या मजल्यावरून राजेशला दिले फेकून!

डोंबिवली – मैत्री करणे, मित्र असणे वाईट नाही परंतु त्यासाठी मित्र चांगले असणे गरजेचे आहे, कारण कुसंगत नेहमीच महागात पडते. चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यामुळे नुकसान होते हे निश्‍चित आहे. त्यातही व्यसनामुळे एकत्र आलेल्या मित्रांमध्ये कधी ना कधी तेढ वाढते आणि आयुष्याची वाताहत होते. याचाच नमुना डोंबिवली येथे पहाण्यास मिळाला. दारूच्या व्यसनामुळे तिघांची मैत्री झाली. तिघे नेहमीच एकत्र फिरू लागले. दरम्यान कोणीतरी दोघांना सांगितले की तुमचा मित्र तुमच्याबद्दल वाईट बोलतो. हे ऐकून त्या दोघांना राग आला. आपल्या मित्रापेक्षा परक्या कोणावर तरी त्यांनी विश्‍वास ठेवला. गोड बोलून मित्राला बोलावले आणि बेदम चोप दिला. नंतर त्याला दुसर्‍या मजल्यावर खाली फेकून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याला मारणारे दोन मित्र गजाआड झाले. 

बसव्वा म्हणे, दारू सोडा, संसार सांभाळा! भांडणात हणमंतने आवळला तिचाच गळा!

गोकाक – संसार हा पती-पत्नी या दोघांचा असतो, पण घराचा कर्ता म्हणून पुरूषाने जबाबदारी पार पाडण्याची गरज असते. पती जबाबदारीने वागू लागला तर त्याला पत्नीचीही साथ लाभते, पण तो घराकडे दुर्लक्ष करू लागला तर मात्र पत्नीला पदर खोचून स्वत:च कर्तेपण घेतल्याशिवाय पर्याय नसतो. ती घराची जबाबदारी पेलू लागली तरीही पतीला ते खपत नाही. त्यातच तो व्यसनी असेल तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतांनाही मागे-पुढे पहात नाही. तिला मारहाण करतांना काही वेळा तिचा जीवही जातो. याचे ताजे उदाहरण ठरणारी घटना गोकाक तालुक्यातील नांगनुर मध्ये शनिवार दि. 3 जून 2023 रोजी घडली. दारूड्या नवर्‍याला पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्याला काम करण्याचा व दारू सोडण्याचा सल्ला दिला. या कारणातून पती रागाने बेभान झाला आणि त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला.

Leave a Comment